मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील सगळेच पात्र लोकप्रिय आहेत. या मालिकेतील जेठालाल आणि बबीता ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीला पडत आहे. असं असताना बबीता उर्फ मुनमुन दत्ता यांचं पात्र अतिशय चर्चेत असतं. 2008 मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका सुरू झाली तेव्हापासून मुनमुन दत्ता या मालिकेचा भाग आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर मुनमुन अतिशय सक्रिय आहे. ती कायमच आपले फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. तसेच को-स्टारसोबत अनेक फोटो शेअर करून चर्चेत राहत असते. यासोबतच मुनमुनने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल पोस्ट शेअर केली आहे. 


2017 मध्ये घडलेल्या एका प्रकाराचा खुलासा तिने एका पोस्टमध्ये केला आहे. या पोस्टमध्ये तिने #METOO बद्दल बोलली आहे. '#METOO च्या मुद्यावरून एवढ्या तरूणी पुढे आल्या की, पुरूषांना मोठा धक्का बसला आहे. मात्र यामध्ये आश्चर्य व्यक्त करण्यासारखं काही नाही. कारण आपल्या शेजारी अशा अनेक घटना घडत असतात. अगदी घरात बहिण, मुलगी, आई, पत्नी एवढंच काय तर अगदी घरात काम करणारी मदतनीस यांच्यासोबतही अघटीत घटना घडत असतात. आपली गोष्ट लिहिताना माझ्या डोळ्यात पाणी येत आहे.'



आपल्या बालपणाच्या आठवणींचा उल्लेख करताना मुनमुन लिहिते की, शेजारी राहणाऱ्या काकांना जेव्हा संधी मिळायची तेव्हा ते मला पकडायचे. एवढंच नव्हे तर हे कुणालाही न सांगायचे ही धमकी द्यायचे. पुढे त्यांनी लिहिलं आहे की,'एवढं नव्हे तर वयाने तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या चुलत भावाने देखील तिच्याकडे वाईट नजरेने पाहिलं आहे.'


2017 साली शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने #METOO चा उल्लेख केला आहे. 13 वर्षांतून पहिल्यांदा तिला एका चुकीच्या स्पर्शाची जाणीव झाली. मग कधी ट्यूशन टीचर तर कधी स्कूल टीचर कोणत्या ना कोणत्या कारणाने शोषण होतच राहिलं आहे.