Taran Adarsh on Adipurush: 'आदिपुरूष' हा चित्रपट सध्या जगभर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, चित्रपटानं आत्तापर्यंत 140 कोटी कमावले आहेत. परंतु सध्या या चित्रपटाला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागते आहे. या चित्रपटात व्हिएफएक्सचा भडिमार करण्यात आला आहे आणि सोबतच या चित्रपटात सर्वत्र पात्रांचे चुकीचे चित्रीकरण करण्यात आल्यानं नेटकऱ्यांनी या चित्रपटाला प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर तर नेटकऱ्यांनी मीम्सचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. त्यापाठोपाठ आता समीक्षकांनीही या चित्रपटाला नेगेटिव्ह रिव्हवूज दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरन आदर्श यांनाही या चित्रपटाला एक आणि अर्धा स्टार दिला असून निराशाजनक चित्रपट असं म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्या ट्विटचीही सगळीकडे बरीच चर्चा रंगली आहे. सध्या त्यांनी एका मुलाखतीत 'आदिपुरूष' या चित्रपटाबद्दल आपलं मतं व्यक्त केलं आहे. त्यामुळे त्याचीही सध्या बरीच चर्चा रंगली आहे. 'आदिपुरूष' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वीही तो वादाच्या भोवऱ्यात होता आता पुन्हा एकदा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यातून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरूनच उत्तर दिली आहे.


16 जून म्हणजे कालच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अनेक प्रेक्षकांनी आणि कलाकारमंडळींनीही या चित्रपटाची प्रसंशा केली असून अनेक प्रेक्षकांनी या चित्रपटावर आपली नाराजी आणि नापसंती दर्शवली आहे. या चित्रपटात व्हिएफएक्सच्या नावाखाली फारच व्यक्तिरेखांचे चुकीचे दर्शन केले आहे. 


या चित्रपटातून अनेक चुकीच्या गोष्टीही समोर आल्या आहेत. सोबतच अशा गोष्टीही समोर आल्या आहेत ज्या निव्वळ अशक्य असाव्यात आणि त्या कधी एकल्याही नसव्यात. त्यामुळे या चित्रपटाला जोरदार टीका सहन करावी लागते आहे. नुकत्याच ‘फिल्मी फिवर’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तरन आदर्श यांनी म्हटलं आहे की, ''जेव्हा तुम्ही रामायण मोठ्या पडद्यावर पाहता तेव्हा ते गांभीर्यानं आणि सचोटीनं पाहायला मिळावं अशी तुम्ही अपेक्षा करत आणि ती रास्त आहे. मी हा चित्रपट पाहून फार अस्वस्थ झालो. ट्रेलरपासूनच मी या चित्रपटाबद्दल साशंक होतो. मी स्वत: ओम राऊत आणि प्रभास यांच्याजवळ माझी नाराजी व्यक्त केली होती. हा चित्रपट पाहून मला प्रचंड दु:ख झालं. रामायणाची यात खिल्ली उडवली गेली आहे. सैफ अली खानचा लूक, संवाद, लेकंचे चित्रिकरण सगळंच निराशाजनक आहे.'' त्यामुळे तरण आदर्श यांनीही या चित्रपटाच्या निमित्तानं आपली नाराजी व्यक्त केली आहे. 


ते पुढे म्हणाले की,''यासाठीच बॉलिवूड बदनाम आहे. 'आदिपुरूष' यांसारख्या चित्रपटांमुळेच आज लोक कुटुंबासह चित्रपटगृहात येत नाहीयेत. यामुळेच चित्रपट फ्लॉप होत आहेत आणि लोकं सडकून टीका करत आहेत. असा चित्रपट सादर करून यांना काय साध्य करायचं आहे. याला विरोध होणं स्वाभाविकच आहे. तुम्ही रामायणसुद्धा इमानदारीनं सादर करू शकत नाहीत याला काय म्हणायचं?''


हेही वाचा - श्रीकृष्णाच्या भुमिकेनंतर घराघरात पोहचलेली 'ही' क्यूट मुलगी मोठी झाल्यावर कशी दिसते? अभिनयापासून आहे दूर


'''आदिपुरुष' हा एक निराशाजनक चित्रपट आहे. तो आपल्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण करत नाही. दिग्दर्शक ओम राऊतकडे एक स्वप्नवत स्टारकास्ट' आणि प्रचंड मोठं बजेट होतं पण त्याचा वापर करून त्याने फक्त गोंधळ निर्माण केला आहे.'' असं ट्विट त्यांनी काल प्रसिद्ध केलं.