मुंबई : कलाविश्वात असे अनेक बाल कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या निरागस भावाने सर्वांच्या मनात घर केलं. अशीच एक गोंडस, निरागस असलेली 'रसना गर्ल'. त्या 'रसना गर्ल'चं नाव होतं तरूणी सचदेव. तरूणी आज आपल्यात नसली तरी ती आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. 'आय लव्ह यू' रसना म्हणत तिने सर्वांना घायाळ केलं. पण कोणाला माहित होतं यशाचं शिखर चढणारी तरूणी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी या जगाचा निरोप घेईल. पण का कोणास ठावूक तिला तिच्या मृत्यूची चाहुल लागली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरूणीचं निधन एका विमान अपघातात झाला आणि दुर्दैवी गोष्ट म्हणजे तिचा जन्म दिवस आणि मृत्यू दिवस एकचं होता. तरूणीचा  जन्म 14 मे 1998 साली झाला आणि 14 मे 2012 साली आईसोबत प्रवास करताना मायलेकीचा मृत्यू झाला. तरूणी तिच्या आईसोबत नेपाळला निघाली होती. त्या अपघातात  15 लोक ठार झाले तर 6 प्रवासी वाचले. 


नेपाळला जाण्यापूर्वी तरूणीने तिच्या सर्व मित्रांना मिठी मारत निरोप घेतला. 'हिच आपली शेवटची भेट...' असं ती मीत्र परिवाराला म्हणाली. पण कोणालाचं कल्पना नव्हती की खरचं तरूणीची शेवटची भेट आहे. तिच्या जाण्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला. करियर करण्यासाठी नाव कमवण्यासाठी मोठ्या-मोठ्या कलाकारांना खस्ता खावा लागला. तरूणीला ते सहज मिळालं होतं. पण नियतीच्या मनात तर काही वेगळचं होतं. 



तरूणीने अनेक जाहिरातींमध्ये काम केलं. चित्रपटामध्ये देखील तिने पदार्पण केलं. 'रसना', 'कोलगेट', 'आयसीआयसीआई बँक', 'रिलायंस मोबाइल', 'गोल्ड विनर', 'शक्ति मसाला' या जाहिरांतींमध्ये तिने काम केलं होतं. तिने मल्यळम 'वेल्लीनक्षत्रम' चित्रपटात देखील काम केलं. एवढंच नाही तर तिने महानायक  अमिताभ बच्चन यांच्या 'पा' चित्रपटात त्यांच्या मैत्रीणीची भूमिका साकारली होती.