मुंबई : 'स्लमडॉग मिलिनियर' सिनेमाच्या संगीताला 10 वर्षे पूर्ण झाले. या निमित्ताने ए आर रहमानने सेलिब्रेशन ठेवलं होतं. या कार्यक्रमात रहमान यांची मुलगी खातीजा बुर्का घालून आली होती. यानंतर ए आर रहमानला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. आता एक वर्षानंतर पुन्हा एकदा रहमान याच मुद्यावरून चर्चेत आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लेखिका तस्लीमा नसरीन यांनी एक फोटो ट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की,'जेव्हा सुशिक्षित लोकं हिजाब घालतात तेव्हा मला गुदमरल्यासारखं होतं.' तस्लीमाने ट्विट करून लिहिलं की,'मला ए आर रहमान यांचं संगीत खूप आवडतं. पण जेव्हा पण मी त्यांच्या मुलीला बघते तेव्हा मला गुदमरल्यासारखं होतं. 'पारंपरिक विचारांच्या कुटुंबात एक शिकलेली मुलगी कशापद्धतीने ब्रेनवॉश होऊ शकते.'



या पोस्टमध्ये तस्लीमा नसरीन यांनी ए आर रहमान यांच्या मुलीचा फोटो पोस्ट केला आहे. या ट्विटनंतर पुन्हा एकदा ए आर रहमान यांना ट्रोल करण्यात आलं आहे. ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. 



गेल्यावर्षी जेव्हा रहमानला ट्रोल करण्यात आलं. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं की,'नीता अंबानीसोबत माझ्या कुटुंबातील महत्वाच्या व्यक्ती खातिजा, रहीमा आणि सायरा. यावर खतीजा यांनी देखील उत्तर दिलं होतं. त्यांनी सांगितलं की, 'तिला बुरखा घालण्यासाठी कधीच कुणी सांगितलं नव्हतं. त्यांनी फेसबुकवरही लिहिलं होतं की, ती समजुतदार आणि मोठी आहे. तिच्या जीवनातील काही निर्णय स्वतः घ्यायचे आहेत.'