मुंबई : अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundra) 'बिग बॉस' शोच्या माध्यमातून एकमेकांच्या जवळ आले. 'बिग बॉस'मध्येचं त्यांच्या प्रेमाचं गुलाब बहरलं. 'बिग बॉस'नंतरही दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट करण्यात आलं. दोघे सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असतात. आता देखील दोघांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेजस्वीने स्वतःचं महागडं स्वप्न पूर्ण केलं आहे, आणि यावेळी देखील करण तिच्यासोबत आहे. तेजस्वीने  ऑडी क्यू 7 कार खरेदी केली आहे. या कारची किंमत जवळपास 90 लाख  रुपये आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कारची पूजा करण्यापासून ते कार घरी आणण्यापर्यंत करण तिच्यासोबत होता. एवढंच नाही तर गर्लफ्रेंडच्या आयुष्यातील खास क्षण स्वतः करणने कॅमेऱ्यात टिपले आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Voompla (@voompla)


सध्या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नवी कार घेण्यासाठी तेजस्वी ग्लॅमरस लूकमध्ये शोरुममध्ये पोहोचली. यावेळी दोघे प्रचंड आनंदी होते.