टीव्ही अभिनेता कुशल पंजाबीची गळफास घेऊन आत्महत्या
टीव्ही अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या
मुंबई : टीव्ही अभिनेता कुशल पंजाबी याने आत्महत्या केली आहे. मुंबईत गुरुवारी रात्री त्यानं गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. आत्महत्ये मागचं कारण अद्याप समोर आलं नाही. कुशलनं काही हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. बांद्रा पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील चौकशी करत आहेत. अभिनेत्याच्या आत्महत्येने अनेकांना धक्का बसला आहे.
कुशल पंजाबीच्या आत्महत्येची बातमी कळताच अभिनेता करणवीर बोहराने आपल्या अकाऊंटवरुन त्याच्यासाठी हे किती धक्कादायक होतं हे शेअर केलं आहे. त्याने म्हटलं की, ''तुझ्य़ा निधनाची बातमी धक्कादायक होती. अजूनही मला यावर विश्वास होत नाही आहे. मला माहित आहे. तु जेथे ही आहेस आनंदी आहेस. ज्या प्रकारे तु आयुष्यभर मला प्रेरणा देत राहिलास. पण मला काय माहित होतं....'
कुशलने शेवटी इश्क में मरजावां मध्ये काम केलं होतं. कुशल पंजाबीच्या वैयक्तीक आयुष्याबदल बोलायचं झालं तर त्याने एका यूरोपियन मुलीसोबत लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगा देखील आहे. त्याचा जन्म 2016 मध्ये झाला आहे. कुशलने आपल्या करिअरची सुरुवात मॉडल म्हणून केली होती. त्याने अनेक सिनेमे आणि टीव्ही शोमध्य़े काम केलं होतं.