बहिणीच्या लग्नात दीपिकाचा पती ओक्साबोक्शी रडला; सर्वांच्याच डोळ्यात पाणी
(Sister wedding) बहीण आणि भावाचे कितीही वाद असो, किसीही रुसवे, फुगवे असो पण या साऱ्यामध्ये ज्यावेळी बहिणीचं लग्न व्हायची वेळ येते तेव्हा मात्र भाऊरायाला अश्रू थांबवता येत नाहीत.
Wedding Season : (Sisters wedding) बहीण आणि भावाचे कितीही वाद असो, किसीही रुसवे, फुगवे असो पण या साऱ्यामध्ये ज्यावेळी बहिणीचं लग्न व्हायची वेळ येते तेव्हा मात्र भाऊरायाला अश्रू थांबवता येत नाहीत. नुकतंच एका सेलिब्रिटी कुटुंबातील विवाहसोहळ्यात हे चित्र पाहायला मिळालं. इथं अभिनेत्री दीपिकाच्या (dipika) नणंदेचा म्हणजेच तिच्या पतीच्या बहिणीचा विवाहसोहळा होता. यावेळी लाडक्या बहिणीला हळद लागण्यापासून तिच्या हाती मेहंदी लागेपर्यंत आणि तिची पाठवणी होईपर्यंत दीपिकाच्या पतीला अश्रू थांबवताच येत नव्हते. खुद्द दीपिकानंही तिच्या भावनांना अश्रूंवाटे व्यक्त होऊ दिलं होतं.
टेलिव्हिजन वर्तुळात लोकप्रियता मिळवलेल्या अभिनेत्री दीपिका कक्कर (Dipika kakkar) आणि अभिनेता शोएब इब्राहिम (shoaib ibrahim) यांच्या लाडक्या सबाचा (शोएबच्या बहिणीचा) निकाह नुकताच पार पडला. लहान मुलीप्रमाणं जपलेल्या सबाला (saba wedding) आपल्यापासून दुरावताना पाहून शोएबला हे दु:ख सहन झालं नाही आणि तिच्या लग्नाच्याच दिवशी तो कोलमडला. (television Actor Shoaib Ibrahim and wife dipika kakkar cries at sisters wedding and bidai ceremony watch video)
बहिणीचा विरह भावाला सहन झाला नाही...
जी बहीण दररोज या न त्या कारणानं सतावत होती, खट्याळ मस्ती करत होती, वेळीच आधारही देत होती ती आता दुसऱ्याच क्षणाला कोणा दुसऱ्याच्या घरात वास्तव्यास असणार, याच भावनेनं दीपिका आणि शोएबला गहिवरून आलं होतं.
वाचा : महिन्याभरात खऱ्या अर्थाने लग्नाचा धुमधडाका; अबब! खर्चाचा आकडा पाहताच व्हाल अवाक्
फक्त ही जोडीच नव्हे, तर शोएबचे आई-वडील आणि इतर भावंडही यावेळी भावूक झाले होते. सबाच्या चेहऱ्यावर एक नवा प्रवास सुरु करण्याचा आनंद तर होता. पण, धीट भावाला असं कोलमडताना पाहून तिच्याही आसवांचा बांध फुटला. (saba and khalid waedding)
बहिणीच्या लग्नासाठी शोएबनं घाम गाळला... (shoaib ibrahim make all arrangments for sisters wedding)
लाडक्या बहिणीच्या लग्नसोहळ्यासाठी दीपिका आणि शोएबनं कोणतीही कमतरता जाणवू दिली नव्हती. राहण्यापासून खाण्यापिण्यापर्यंत, सजावटीपासून कपडे आणि दागदागिन्यांपर्यंत सर्व व्यवस्था त्या दोघांनी सुरेखपणे पाहिली. इतकंच नव्हे, तर बहिणीच्या लग्नात आपण एक सेलिब्रिटी आहोत ही गोष्ट मागे ठेवत शोएब पाहुण्यांना जेवण वाढताना दिसला. हे सर्व एक भाऊच करु शकतो, अशाच प्रतिक्रिया या लग्नसोहळ्याचे व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी दिल्या.