महिन्याभरात खऱ्या अर्थाने लग्नाचा धुमधडाका; अबब! खर्चाचा आकडा पाहताच व्हाल अवाक्

Wedding Season : एकट्या मुंबई आणि दिल्लीमध्ये लाखोंच्या संख्येनं लग्नसोहळे पार पडणार आहेत अशी आकडेवारी समोर आली. 

Updated: Nov 8, 2022, 12:22 PM IST
महिन्याभरात खऱ्या अर्थाने लग्नाचा धुमधडाका; अबब! खर्चाचा आकडा पाहताच व्हाल अवाक् title=
32 lakh weddings in india from 4 November to 14 December with trade of inr 3.75 lakh crores business

Wedding Season : रस्त्यारस्त्यापासून ते अगदी चौक आणि गल्लीबोळापर्यंत सध्या धुमधडाका पाहायला मिळत आहे तो म्हणजे वरातींचा, लग्नसोहळ्यांचा. (Tulasi Vivah) तुळशीची लग्न उरकली, की लग्नसराई सुरु झालीच म्हणून समजा, असं घरातले मोठे का म्हणत असतात याचा अंदाज तुम्हालाही आला असेल. कारण अधिक मास (Adhik Maas), पितृपक्ष (Pitrupaksh), वगैरे वगैरे... सर्व अडथळे दूर झाल्यानंतर आता अखेर लग्नसराईची (Wedding Season) सुरुवात झाली आहे. 

महिन्याभरात होणाऱ्या लग्नांचा आकडा हैराण करणारा 

तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण 4 नोव्हेंबरपासून (November to December) 14 डिसेंबरपर्यंत, साधारण महिन्याभराच्या कालावधीत भारतात जवळपास तब्बल 32 लाख लग्नसोहळे पार पडणार आहेत. यासाठी कोट्यवधीच काय, अरबो रुपयांचा खर्च होणार आहे. तर तब्बल 3.75 लाख कोटी रुपयांची व्यवसाय वृद्धी पाहायला मिळणार आहे. देशातील ट्रेडिंग कम्युनिटी CAIT नं यासंदर्भातील माहिती दिली. (32 lakh weddings in india from 4 November to 14 December with trade of inr 3.75 lakh crores business)

सदरील आकडेवारी मिळवण्यासाठी एक निरीक्षण करण्यात आलं होतं. ज्यामध्ये 35 शहरं आणि 4,302 व्यापाऱ्यांसह विविध सुविधा पुरवणाऱ्या उद्योजकांचा समावेश होता. यातून एकट्या मुंबई आणि दिल्लीमध्ये लाखोंच्या संख्येनं लग्नसोहळे पार पडणार आहेत अशी आकडेवारी समोर आली. 

लग्नाच्या निमित्तानं कापड आणि दागिने व्यवसायिकांची चांदी 

लग्नसराई म्हटलं की प्रत्येकाचीच सजण्यासवरण्याची हौस. हीच हौस भागवण्यासाठी विविध बाजारपेठांपासून मोठमोठे सेलिब्रिटी डिझायनर्सही सज्ज झाले आहेत. यामध्ये अगदी हातमागावर काम करणाऱ्यांपासून होलसेल आणि रिटेल दरानं कपडे विकणाऱ्यांनाही फायदा होताना दिसत आहे. 

फक्त कापड उद्योग (Clothing business) नाही, तर दागिने (Jwelery), केटरिंग सुविधा पुरवणारे व्यावसायिक (catering), डेकोरेटर्स (Decorators), फुलांचे व्यापारी ही एक संपूर्ण साखळीच नफा कमवताना दिसणार आहे. 

वाचा : Vivaah Muhurat 2022-23:नोव्हेंबरमध्ये 'या' तारखेपासून सुरू होणार लग्नाचे शुभ मुहूर्त, जाणून घ्या

कोरोनाचे शिथिल झालेले  निर्बंध आणि त्या धर्तीवरच लग्नसमारंभांची केलेली आखणी पाहता येत्या काळात देशात एक अनोखा उत्सवच पाहता येणार आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

नोव्हेंबर 2022 पासून मार्च 2023 पर्यंतचे लग्नमुहूर्त 

नोव्हेंबर महिन्यात 21, 24, 25, 27 तारखांना लग्नमुहूर्त आहेत. तर, डिसेंबरमध्ये 2, 7 ते 9 आणि 14 तारखेला लग्नाचे मुहूर्त उपलबध आहेत. पुढच्या वर्षी, म्हणजेच जानेवारी 2023 मध्ये 15, 18, 25, 26, 27, 30 आणि 31 तारखेला लग्नाचे मुहूर्त आहेत. फेब्रुवारीमध्ये तुलनेने सर्वाधिक मुहूर्त पाहायला मिळत आहेत. या महिन्यात 6 ते 14 आणि 22, 23, 28 तारखांना विवाहमुहूर्त आहेत. मार्च महिन्यात लग्नासाठी अवघे 4 दिवस मुहूर्त आहेत. या महिन्यात 6, 9, 11 आणि 13 या दिवसांना विवाहमुहूर्तांचा योग आहे.