मुंबई : महिला सुरक्षितता आणि त्याभोवती फिरणाऱ्या अनेक मुद्द्यांची गेल्या बऱ्याच वर्षांपासून चर्चा सुरु आहे. पण, तरीही काही अंशी महिलांच्या सुरक्षिततेकडे, किंबहुना महिलांकड़ेच पाहण्याचा दृष्टीकोन अद्यापही बदलला गेला नसल्याचं स्पष्ट होत आहे. फक्त सर्वसामान्य वर्गातील महिलांनाच अशा प्रसंगांचा सामना करावा लागतो असं नाही. तर, प्रसिद्धीझोतात असणाऱ्या महिलांनाही अशा प्रसंगांना सामोरं जावं लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेलिव्हिजन वर्तुळात नावाजलेली अभिनेत्री Chahatt Khanna चाहत खन्ना हिला अशाच एका प्रसंगाचा सामना करावा लागला होता. 'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत तिने याविषयीचा खुलासा केला. एका कॅब चालकाच्या गैरव्यवहारामुळे आपण बेजार झाल्याचं ती या मुलाखतीदरम्यान म्हणाली. 


'माझ्यासाठी तो अतिशय कठिण दिवस होता. विमातळाच्या दिशेने जाणाऱ्या कॅब चालकाने माझ्यासोबत सेल्फी काढण्यासाठी मला कॅबमधून उतरण्याचाच पाढा वाचण्यास सुरुवात केली. त्याने कॅब मध्येच थांबवली जेथे कोणीच नव्हतं', या प्रसंगाला कसंबसं तोंड दिल्यानंतर चाहतसोबत आणखी एक अनपेक्षित आणि काहीसा वाईट प्रसंग घडला. 


पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ 


विमानात बसले असतानाच काही तांत्रिक कारणांमुळे आपात्कालीन परिस्थितीतच विमान धावपट्टीवर अताना वैमानिकाला ब्रेक लावावा लागला, त्यावेळी विमानातील अनेकांचा जीव वाचला. तो दिवस अशाच काहीशा घडामोडींचा होता. ज्यानंतर चाहतने घरी येताच सुटकेचा नि:श्वास सोडला. 




गेल्या काही दिवसांपासून चाहत तिच्या मालिकांसोबतच आणखीही काही कारणांमुळे चर्चेत आली आहे. रिबू मेहरासोबतच्या आपल्या नात्याला मैत्रीचं नाव देत तिने पूर्वाश्रमीचा पती फरहान याच्यावर काही आरोप केले. माध्यमांसमोर फरहानने नेहमीच अपमानित करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकावरुनच माझ्यावर संशय घेण्याचा फरहानचा स्वभाव असल्याचं म्हणत आता तो जे म्हणेल त्याला होकार देण्याचाच पर्याय आपण निवडल्याचं ती म्हणाली. त्याच्यासोबतचं संभाषण इथेच थांबवण्यासाठी चाहतने हा मार्ग अवलंबला आहे. एकंदर खासगी आयुष्यात चाहतला सध्या तणावाच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.