Debina Benerjee: टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री देबिना बॅनर्जी दुसऱ्यांदा आई होणार आहे. ही गुड न्यूज देबिनानंच सोशल मीडियावरून दिली होती. देबिना आणि गुरमित चौधरी यांची जोडी आहे. गेली कित्येक वर्ष त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नाच्या 11 वर्षानंतर त्यांना एक मुलगी झाली आहे आणि तिचं नावं आहे लियाना. आता देबिना आणि गुरमीत चौधरी यांच्या घरी लवकरच नव्या पाहूण्याचे आगमन होणार आहे. 


त्यामुळे प्रेग्नंट असताना तिने बेबी बंप दाखवत डान्स केला आहे आणि या डान्सचा व्हिडीओ तिने इन्टाग्रामवर शेअर केला आहे.


या क्लिपमध्ये तिने ब्लॅक फ्लोरल प्रिंटेड शॉर्ट फ्रॉक ड्रेस घातला आहे. देबिना बॅनर्जी डान्स व्हिडिओमध्ये बेबी बंपसोबत अतिशय क्यूट डान्स करताना दिसत आहे. तसेच तिच्या प्रेग्नेंसी ग्लोमुळे तिच्या सौंदर्यात भर पडत आहे.


देबिनाच्या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. तसेच तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करून लिहिले, 'हॉटेस्ट मॉम्मा.' दुसऱ्याने लिहिले, 'सुपर मॉम.' 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती ज्यात त्यांनी घोषणा केली होती की देबिना लवकरच दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहे. पोस्टमध्ये सोनोग्राफीचा एक फोटो शेअर करत गुरमीत-देबिना यांनी चाहत्यांना ही गोड बातमी कळवली होती.