मुंबई : अभिनेत्री हिना खान हिने काही दिवसांपूर्वीच 'कान' चित्रपट महोत्सवात हजेरी लावली होती. रेड कार्पेटवर येणारी हिना तिच्या रुपाने अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकवून गेली. तिच्या या येण्यावर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. तर, काहींनी तिच्यावर टीकाही केल्याचं पाहायला मिळालं. एका मासिकाच्या संपादकांकडून आपल्यावर केल्या गेलेल्या याच वक्तव्यांमुळे आपण दुखावलो गेल्याची प्रतिक्रिया तिने दिली. हिनाविषयी, कान आता चांदिवलीच्या एखाद्या स्टुडिओप्रमाणे होऊ लागलं आहे, असं विधान करण्यात आलं होतं. ज्यामुळे आपण दुखावल्याची प्रतिक्रिया तिने दिली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत तिने याविषयीचा खुलासा केला. मला दु:ख झालं आणि मी ते नाकारतही नाही. असं विधान करण्याची काहीच गरज नसल्याचं म्हणत तिने 'त्या' मासिकाच्या संपादकांवर नाराजी व्यक्त केली. फक्त स्वत:साठीच वाईट वाटलं नसून इथवर पोहोचण्यासाठी घेण्यात आलेले प्रयत्नही एका अर्थी दुखावल्याची भावना तिने व्यक्त केली.



'कान'च्या रेड कार्पेटवर हिनाच्या येण्याने अनेकांनीच तिला दाद दिली होती. पण, तिच्याविषयी करण्यात आलेलं 'चांदिवली स्टुडिओ'चं हे विधान मात्र अनेकांनाच निराश करुन गेलं. या परिस्थितीत सुमोना चक्रवर्ती, अर्जुन बिजलानी आणि खुद्द एकता कपूर हिनाच्या पाठिशी होते. किंबहुना अभिनेता सलमान खान यानेही तिच्या बचावपक्षी आपली प्रतिक्रिया दिली होती. एका जबाबदार संपादकाकडून अशा प्रकारची प्रतिक्रिया येण्याची गरजच नव्हची असं वक्तव्य त्याने केलं होतं. 
हिनाने यंदाच्या म्हणजेच ७२ व्या कान चित्रपट महोत्सवात ब्राझिलीयन चित्रपट Bacurau च्या वेळी हजेरी लावली होती. यावेळी राखाडी रंगाच्या ट्रेल असणाऱ्या पायघोळ गाऊनमध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं होतं. याच सोहळ्यामध्ये हिनाची भेट अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्याशी झाली होती. प्रियांकाच्या भेटीविषयीही हिनाने एका पोस्टमधून त्या वातावरणात अगदी सहजतेनं वातावरण्यास मदत केल्याबद्दल तिचे आभार मानले होते.