मुंबई : टेलिव्हिजन जगतात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्या खासगी आयुष्यात काही महिन्यांपूर्वी वादळ आलं होतं. ज्यामुळं तिच्या वैवाहिक नात्याला तडा गेला होता. अभिनेता आणि पूर्वाश्रमीचा पती अभिनव कोहलीसोबतं श्वेताचं नातं एका अनपेक्षित आणि वादग्रस्त वळणावर येऊन थांबलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पतीपासून वेगळं होऊन काही महिने उलटले असतानाच आता पुन्हा एकदा श्वेता आणि अभिनव एकत्र आल्याच्या चर्चांनी जोर धरला. किंबहुना श्वेता पतीकडे परतल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्धही केलं. 


आपल्याविषयी होणाऱ्या याच सर्व चर्चा पाहता अखेर खुद्द श्वेतानंच काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. अभिनव कोहलीसोबतच्या नात्यात आलेल्या तणावानंतर कोणत्याही प्रकारे परिस्थिती सुधारली नसल्याचं तिनं सांगितलं. अभिनवनं सोशल मीडियायवर केलेल्या पोस्टमुळं या चर्चांनी डोकं वर काढलं. 


स्पॉटबॉय ईच्या वृत्तानुसार याबाबत माहिती देत श्वेता म्हणाली, 'हल्ली कोणी काहीही बोललं तर त्याची बातमी छापली जाते. आणि माझ्या मते हीच खोटेपणाची योग्यता आहे'. 


मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून श्वेता आणि अभिनवच्या नात्यात तणावाची ठिणगी पडली होती. ज्यानंतर एका मुलाखतीदरम्यान तिनं हे लग्नाचं नातं म्हणजे विषबाधेचा प्रयोगच अशा शब्दांत नात्याची खरी बाजू सर्वांसमोर मांडली होती. 



 


म्हणून अभिनव- श्वेता एकत्र आल्याचं म्हटलं गेलं... 


शुक्रवारी अभिनवनं एक सोशल मीडिया पोस्ट केली. ज्यामध्ये त्यानं श्वेताचा फोटो शेअर करत तिनं आपल्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली नसल्याचं सांगितलं. एका भल्यामोठ्या कॅप्शनसह त्याची ही पोस्ट बऱ्याच प्रश्नांना चालना देऊऩ गेली. ज्याविषयी अखेर खुद्द श्वेतानंच पुढं येत वास्तव सर्वांसमक्ष ठेवलं.