मुंबईः टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक सौंदर्यवती आहेत ज्यांनी सुसंस्कृत सुनेच्या इमेजमुळेच लोकांच्या हृदयात स्वतःची अशी एक छाप सोडली आहे. शो ऑफ एअर झाल्यानंतरही चाहते अशा हिरोईन्सना सहज विसरू शकलेले नाहीत. यातील एका सुंदरीचं नाव आहे दिव्यांका त्रिपाठी. सध्या दिव्यांका पती आणि अभिनेता विवेक दहियासोबत मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान अभिनेत्रीने पूलमधला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे जो पाहून चाहत्यांचे डोळे मोठे झाले. पूलमधला तिचा तो फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


सूट्टी एन्जॉय करताना तिने बिकीनी लुक घातला आहे आणि तो घालून ती पाण्यात तिचा व्हेकेशन मुड एन्जॉय करते आहे. दिव्यांका त्रिपाठी तिच्या लेटेस्ट फोटोमध्ये पूलमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये ती खूपच आनंदी दिसत आहे. समोर वाईनचा ग्लास ठेवला आहे आणि समोर पसरलेला निळा समु्द्र तिच्या फोटोत सौंदर्याची भर घालत आहे. 


दिव्यांकाने या व्हेकेशनचे अनेक रोमँटिक फोटो शेअर केले ज्यात ती विवेकसोबत दिसली होती. तिचा बिकीनी लुक पाहून चाहत्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या कारण इतके वर्षे संस्कारी सून म्हणून ती प्रेक्षकांसमोर आली आहे आणि त्यामुळे तिच्या पर्सनल आयुष्यात हे असे बॉल्ड फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. 


दिव्यांका त्रिपाठी पूलमध्ये काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. 'संडे स्पेशल.' असे कॅप्शन देऊन तिने हा फोटो इन्टाग्रामवर शेअर केला आहे. दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांचा 8 जुलै रोजी वाढदिवस होता. टीव्हीवरचे हे पॉवर कपल विवेक आणि दिव्यांका मालदीवमध्ये एकत्र व्हेकेशन एन्जॉय करत आहेत. 



'ये है मोहब्बतें' या मालिकेत दिव्यांका त्रिपाठीने इशिता भल्ला म्हणजेच ईशी माँची भूमिका साकारली होती. या मालिकेने दिव्यांकाची लोकप्रियता आणखी वाढवली. हा शो बंद झाला तरीपण दिव्यांका आजही घरोघरी प्रसिद्ध आहे.