`या` टेलिव्हिजन कलाकारांनी सांगितले Halloween Party चे किस्से; पाहा लेट नाईट पार्टीमध्ये काय चालतं
TV कलाकार आयुध भानुशाली, आशना किशोर, आसिफ शेख अशांनी आपल्या हॉलोविन पार्टीचे किस्से मीडियासोबत शेअर केले आहेत.
Television Celebrity Halloween Party: टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये कायमच पार्ट्यांचा आनंद बहरत असतो. बाहेर परदेशात मोठ्या प्रमाणात हॅलोविन पार्टीचा (Halloween Party) आनंद लुटला जातो. जवळजवळ संपूर्ण जगात हॅलोविन हा सण दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो आणि भारतातही ही परंपरा संपूर्ण उत्साहाने साजरी केली जाते. प्रत्येकजण या प्रसंगी विविध प्रकारचे पोशाख घालतो. एकमेकांना 'ट्रिक-ऑर-ट्रीट' (Trick or Treat) भेटवस्तू देतो. Iघरी छान सजावट करतो. या सेलिब्रेशनला कुठलेच सेलिब्रेटी अपवाद नाहीत मग टेलिव्हिजन अभिनेत्री-अभिनेते (Television Celebs) तरी का अपवाद राहतील? टिव्ही कलाकारही आनंदानं यात सहभागी होतात. TV कलाकार आयुध भानुशाली (Ayudh Bhanushali), आशना किशोर (Ashana Kishore), आसिफ शेख (Asif Sheikh) अशांनी आपल्या हॉलोविन पार्टीचे किस्से मीडियासोबत शेअर केले आहेत. (television actresses and actors celebrates halloween party shares late night celebrations)
टीव्ही (TV) शो दोन 'मॉं' (Maa) मधील कृष्णाची भूमिका साकारणारा आयुध भानुशाली म्हणाला, “माझ्या शाळेत गेल्या वर्षी आयोजित केलेली हॅलोवीन पार्टी मला खूप आवडली. आमची एक छोटी कॉस्च्युम पार्टी होती आणि मला सर्वोत्कृष्ट हॅलोविन कॉस्च्युमचा पुरस्कार मिळाला ज्याचा मी विचारही केला नव्हता. माझ्या आईने मला मोठ्या आणि जाड हॅलोविन भोपळ्यासारखे कपडे घातले होते. आमच्या शिक्षकांनी देखील हॅलोविन साजरी करण्यासाठी विविध पोशाख परिधान केले आणि पम्पकिन कार्व्हिंग (Pumkin Craving), ऍपल बॉबिंग (Apple Bombing), हॅलोविन बिंगो (Halloween) आणि हॅलोविन ट्रेझर हंटिंग (Halloween Treaser Hanting) सारख्या स्पर्धा (Competitions) आयोजित केल्या. आम्ही खूप मज्जा - मस्ती केली. या वर्षी मी जयपूरमध्ये शूटिंग करत आहे. मीही तिथे लोकांना हॅलोविनच्या गोष्टी सांगून आणि वेश परिधान करून घाबरवतो आहे.
हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?
तर शो 'हप्पू की उल्टान पलटन'मध्ये केट सिंगची भूमिका साकारणारी आशना किशोर म्हणाली, “माझ्या शाळेच्या दिवसात, मी आणि माझा भाऊ आमच्या मित्रांसाठी हॅलोविन पार्टी करायचो. सुरुवातीला माझ्या आईच्या मदतीने आम्ही हॅलोवीन-थीममध्ये राक्षसांच्या आकारातले पदार्थ आणि रक्ताच्या रंगाच्या जामने भरलेले कपकेक (How To Make Cupcake) असायचे. आम्ही कायमच भयानक संगीत लावायचो आणि तसं वातावरण निर्माण करायचो. त्यानंतर आम्ही आमच्या काही मित्रांसोबत प्रँक (Pranking0 करण्याचा प्लॅन बनवायचो.
आम्ही आमच्या छतावर एक अतिशय भितीदायक राक्षसी मुखवटा टांगायचो जेणेकरुन घरात पाऊल टाकणारा प्रत्येकजण हा भयंकर भुताटकीचा चेहरा पाहून घाबरेल. खूप मजा यायची. पार्टीनंतर आम्ही एकमेकांना घाबरवण्यासाठी काही भयानक चित्रपट बघायचो आणि काही भयपट वाचायचो आणि रात्रभर मजा करायचो. या हॅलोविनमध्ये मला दिल्लीला जाण्याची संधी मिळाली तर मी माझ्या बालपणीच्या मित्रांसोबत असेच काहीतरी करेन, असं ती म्हणाली.
हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य
'भाबीजी घर पर हैं' (Bhabhi Ji Ghar Pe Hai) या शोमध्ये विभूती नारायण मिश्राची भूमिका करणारा आसिफ शेख म्हणाला, "खरं सांगायचं तर, मी कधीही हॅलोवीन पार्टीला गेलो नाही, पण 'भाबीजी घर पर हैं' मधून प्रत्येक वेळी मी सेटवर ड्रेस अप करतो तेव्हा मी हॅलोविन साजरे करत आहे असे वाटते, असं तो हसत म्हणाला. मला आठवतं, गेल्या वर्षी मी बेला डोना म्हणून होतो, अॅनाबेलेच्या (Annebelle Movie on ott) पात्रापासून थोडी प्रेरणा घेतली होती. त्यानंतर मी जोकर झालो होतो.