मुंबई : जवळपास १२ वर्षांहून अधिक काळासाठी प्रेक्षकांच्या नावर अधिराज्य गाजवणाऱ्या 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेनं आतापर्यंत ३००० भागांचा टप्पा ओलांडला आहे. मालिका वर्तुळात आघाडीच्या वाहिन्यांवरील मालिकांनाही तगडं आव्हान देणाऱ्या तारत मेहतामधील 'जेठालाल' म्हणजेच अभिनेते दिलीप जोशी यांनी नुकतंच एका युट्यूब पॉडकास्टमध्ये सहभागी होत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील काही काळापासून एक असाही वर्ग आहे, ज्यांच्याकडून तारक मेहता आता बंद करावी अशी मागणीही करण्यात येत आहे. अशा सर्वांनाच उद्देशून जोशी म्हणाले, 'सोशल मीडियावर अनेकदा तार मेहतावर बंदीच आणू असं म्हटलं जातं. मालिकात संपवू असा अनेकांचा रोख असतो. पण, त्यांना मी इतकंच सांगू इच्छितो की तुम्हाला आवडत नसेल तर, तुम्ही मालिका नका पाहू. आम्हाला मालिका संपवण्यास तुम्ही का सांगत आहात? खूप लोकं खूप काही बोलतात. पण, तर तुम्ही त्यांचं ऐकलं तर तुम्हाला काम करणंही अशक्य असेल'. 


 


मालिकेच्या प्रक्षेपणाचे दिवस पाहता याचा लेखकावरही ताण असतो परिणामी अनेकदा मालिकेच्या लेखनावर याचे परिणाम होतात असं सांगत त्यांनी याची तुलना एखाद्या कारखान्याशी केली. मालिकेतील काही भागांमध्ये सादर करण्यात आलेले विनोद हे तितके दर्जात्मक नव्हते ही बाबही त्यांनी स्वीकारली.