`ठाकरे` सिनेमातील डायलॉगचे Memes सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर धुमाकूळ
मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर 'ठाकरे' या सिनेमाची निर्मिती करण्यात आली. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरच्या माध्यमातून सिनेमाचे अनेक डायलॉग समोर आले आहे. तर अनेकांनी या डायलॉगवरून Memes तयार केले आहेत.
नवाजुद्दीन सिद्दीकी या सिनेमात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारत आहे. नवाजुद्दीनच्या निवडीबाबत अगदी सुरूवातीला थोडा वाद झाला. पण आता नवाजुद्दीनच्या डायलॉगला आपापल्या स्टाइलमध्ये सोशल मीडियावर शेअर करत आहे.
हा सिनेमा तीन संवादांमुळे सेन्सरमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. तसेच एका समाजाविरोधात प्रचार केल्याचा आरोप या सिनेमात लावण्यात आला आहे.
या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर खूप ट्रोल झाला आहे. या दरम्यान नवाजुद्दीनचे डायलॉग खूप व्हायरल होत आहे. पाहा याचे काही मीम्स
सगळ्यांनी नवाजुद्दीनच्या हिंदी ट्रेलरमधील 'एक संगठन की शुरूआत करनी होगी' या डायलॉगला आपापल्या प्रश्नांशी जोडलं आहे.
कुणी याला गोवा जाण्याच्या प्लानशी जोडत आहे. तर कुणी या डायलॉगला दोन वर्षांपासून होत असलेल्या इंक्रीमेंटशी जोडलं आहे. आता संघटना करण्याची गरज आहे.
या सिनेमातील अनेक सीन्समुळे याला विरोध होत आहे.
'ठाकरे' या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारत आहे. या सिनेमाची खूप चर्चा होताना दिसत आहे कारण सिनेमातील नवाजुद्दीन सिद्दीकीचा लूक अगदी बाळासाहेबांसारखा दिसत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावित व्यक्तीमत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे उत्तम कार्टूनिस्ट देखील होते. बाळासाहेबांनी सामाजिक कार्यकर्त्याच्या रुपात आपल्या करिअरला सुरूवात केली त्यानंतर त्यांनी शिवसेनेची निर्मिती केली.