Actress Swept to Death : योगा करण्यासाठी सगळे असं ठिकाण निवडतात जिथे शांती असेल. मग त्यात घराची गॅलरी, पार्क किंवा मग समुद्र किनारा, अशा अनेक जागा योगा करण्यासाठी निवडतात. पण समुद्र किनारी योगा करणं एका अभिनेत्रीला महागात पडलं आहे. ही अभिनेत्री समुद्र किनारी योग करत असताना भलीमोठी लाट आली आणि त्यात तिला स्वत: चा जीव गमवावा लागला आहे. ही रशियाची अभिनेत्री असून तिचं नाव मकिला बेल्यात्सकाया आहे. मकिला ही थायलॅन्डमध्ये एका द्विपावर योग करत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मकिला ही योग करत असताना भलीमोठी लाट आली आणि त्यात ती वाहून गेली. ही घटना थायलॅन्डमध्ये झाली. मकिला ही फक्त 24 वर्षांची होती आणि ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी थायलॅंडला आली होती. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात मकिला योग करताना दिसत आहे आणि कशा प्रकारे अचानक भलीमोठी लाट आल्यानं ती ठीक झाली. 



थायलॅंड मीडिया मेट्रोच्या रिपोर्टनुसार, तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं तिला वाचवण्याचे प्रयत्न केले. पण त्यात तो अपयशी ठरला. मकिलाचं पार्थीव हे समुद्र किनाऱ्यापासून बऱ्याच लांब सापडलं. खरंतर जिथे मकिआसोबत ही घटना घडली ती जागा तिला खूप जास्त आवडायची. ती अनेकदा सोशल मीडियावर त्या ठिकाणाचे फोटो शेअर करायची. तिनं सोशल मीडियावर या ठिकाणाचा फोटो शेअर करत पृथ्वी तलावर असलेली जगातील सगळ्यात सुंदर ठिकाण म्हटलं आहे. 


हेही वाचा : 'स्त्री 2' ला यश मिळूनही राहतं घर सोडून भाड्याच्या घरात राहणार श्रद्धा: महिन्याला देते लाखोंचं भाडं


या ठिकाणाची स्तुती करत तिनं लिहिलं होतं की सोशल मीडियावर मला समुई खूप आवडतं. पण ही जागा, हा खडकाळ समुद्र किनारा, माझ्या आयुष्यातील सगळ्यात चांगली गोष्ट आहे, जी मी कधीच पाहिली नव्हती. मी आता इथे आहे आणि आनंदी आहे यासाठी ब्रह्मांडचं आभार दरम्यान, जेव्ही ही वाईट घटना झाली त्या आधीच मकिला ही त्या लाटांचा आनंद घेत होती.