Thapki Pyar Ki Actress Jigyasa Singh Death Hoax: थपकी प्यार की (Thapki Pyar Ki) या मालिकेतील अभिनेत्री जिज्ञासा सिंह हिच्या निधनाची अफवा पसरताच एकच खळबळ उडाली होती. अभिनेत्रीचे कार अपघातात निधन झाले असल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, अभिनेत्री जिज्ञासा सिंह हिनेच या अफवा असल्याचे स्पष्ट करत फेक न्यूज पसरवणाऱ्यांना धारेवर धरलं आहे. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत तिने ही माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर अनेकदा कलाकारांबाबत फेक न्यूज पसरवल्या जातात. अनेकदा या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नसते. अशावेळी कधीकधी कलाकारांनाच या अफवांबाबत स्वतः पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावे लागते. असाच प्रकार Jigyasa Singhसोबत घडलं आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत या वृत्ताचे खंडन केले आहे.


काय घडलं नेमकं?


युट्यूबचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यात लिहलं होतं की थपकी फेम अभिनेत्री जिज्ञासा सिंह हिचे कार अपघातात निधन झाले आहे. व्हिडिओमध्ये तिच्या फोटोला हार घातल्याचेही दिसत आहे. तर, बाजूला एक रुग्णवाहिका दिसत असून तिथे मोठ्याप्रमाणात गर्दीही जमा झाली होती. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांना यावर विश्वास ठेवणे कठिण जात होती. अखेर जिज्ञासानेच यावर पुढे येत स्पष्टीकरण दिलं आहे. 


आपल्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर जिज्ञासा सिंहलाच सोशल मीडियावर येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले. तिने म्हटलं आहे की, कोण आहेत हे लोक जे अशी अफवा पसरवत आहेत. मी जिवंत आहे. चमत्कार चमत्कार. फेक चॅनल अशाप्रकारच्या फेक न्यूज पसरवणे बंद करा.


कोण आहे जिज्ञासा सिंह 


थपकी प्यार की मालिका काही दिवसांपूर्वीच बंद झाली होती. त्यानंतर जिज्ञासा सिंह लाइमलाइटपासून दूर होती. आता तिच्या निधनाची अफवा पसरताच ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या निधनावर दुखःदेखील व्यक्त केले आहे. 


थपकी प्यार की ही मालिका 2015मध्ये कलर्स वाहिनीवर सुरू झाली होती. 2017पर्यंत ही मालिका सुरू होती. तब्बल 704 एपिसोड पूर्ण झाले होते. या मालिलेकीत भूमिकेसाठी जिज्ञासा सिंहचे कौतुकही करण्यात आले होते. जिज्ञासा व्यतिरिक्त या मालिकेत प्रमुख भूमिकेत आकाश अहुजा, मनीष गोपलानी, नितांशी गोएल, अंकिता बाठला, शीना बजाज आणि मोनिका खन्नादेखील होते. या मालिकेव्यतिरिक्त जिज्ञासाने शक्ति-अस्तित्व के अहसास या मालिकेतही काम केलं होतं.