IND vs NZ: कोहलीचा 'विराट' विक्रम! बनवला 'हा' रेकॉर्ड, नाव दिग्ग्जच्या यादीत सामील

Virat Kohli: विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात शानदार खेळी करत एक मोठा विक्रम केला आहे. 

| Oct 18, 2024, 19:06 PM IST
1/6

Most Test Runs for India: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात शानदार खेळी करत एक मोठा विक्रम केला आहे. पहिल्या डावात 0 धावांवर बाद झालेल्या कोहलीने दुसऱ्या डावात शानदार खेळ करत 102 चेंडूत आठ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 70 धावा केल्या.   

2/6

नवीन रेकॉर्ड

या शानदार खेळीदरम्यान विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 9000 धावा पूर्ण केल्या आहेत. तो धावनाचा हा आकडा गाठणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला.  त्याच्या आधी सचिन तेंडुलकर (15921 धावा), राहुल द्रविड (13288 धावा) आणि सुनील गावस्कर (10122 धावा) या दिग्ग्ज खेळाडूंनी भारतासाठी ही कामगिरी केली होती.

3/6

सर्वात कमी 9000 कसोटी धावा

हे लक्षात घ्या की भारतासाठी 9000 कसोटी धावा पूर्ण करणारा कोहली सर्वात स्लो खेळाडू ठरला आहे. त्याने 197 डाव खेळून  9000 कसोटी धावांचा हा टप्पा गाठला. या यादीत राहुल द्रविड १७६ डावांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर सचिन तेडुलकरने 179 डावांत आणि सुनील गावस्करने 192 डावांत 9000 कसोटी धावा पूर्ण केल्या.

4/6

कसा होता खेळ?

पहिल्या डावात 356 धावांच्या मोठ्या फरकाने पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावात 95 धावा होईपर्यंत कर्णधार रोहित शर्मा (52) आणि यशस्वी जैस्वाल (35) यांच्या विकेट्स गमावल्या. यानंतर कोहलीने सर्फराज खानसह (नाबाद 70) डाव पुढे नेत तिसऱ्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारी केली.

5/6

विराट कोहलीच्या खास 15000 धावा

विराट कोहली हा खेळाडू भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर 15000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला भारतीय ठरला आहे. आतापर्यंत केवळ पाँटिंग, संगकारा आणि केन विल्यमसन या खेळाडूंनी ही कामगिरी केली आहे.

6/6

विराट कोहलीने बेंगळुरूमध्ये अर्धशतक झळकावणे खूप खास आहे. याचे कारण विराटने 11 महिन्यांनंतर कसोटीत अर्धशतक झळकावले आहे. विराट कोहली शेवटच्या 8 डावात संघर्ष करत होता पण अखेर त्याला बंगळुरूमध्ये यश मिळाले.