मुंबई : स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिका ठरलं तर मग अवघ्या काही वेळातच उंचीच्या शिखरावर पोहचली आहे. ठरलं तर मग मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. प्रेक्षकांच्या याच प्रेमापोटी मालिका गेल्या अनेक आठवड्यांपासून नंबर वन वर आहे. सध्या या मालिकेला वेगळं वळण मिळालं असून. अर्जुन-सायली माथेरानला फिरायला जातात.  लग्नानंतर अर्जुन-सायलीने हनीमूनला जावं अशी अर्जुनच्या आईची इच्छा होती. आईच्या सांगण्यावरुनच हो नाही म्हणता म्हणता माथेरानच्या प्लॅनवर शिक्कामोर्तब होतं.   सायली-अर्जुनवर प्रेक्षक जीवापाड प्रेम करतात. अवघ्या काही वेळातच प्रेक्षकांनी ही मालिका डोक्यावर घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र अर्जुनने आपल्या दोघांमध्ये मैत्रीचं नातं आहे, त्यामुळे हनीमून नाही तर या ट्रीपला फ्रेण्डमून म्हणून जाऊया असं सांगून तो सायलीचं मन वळवतो. माथेरान सफरीमध्ये नेमक्या काय गंमती-जंमती पाहायला मिळणार हे लवकरच कळेल. मात्र आज समोर येणाऱ्या भागात एक गंमतीशीर गोष्ट पहायला मिळणार आहे. सुरुवातीला अर्जून-सायली माथरानमधील एका मंदिरात जातात. त्यांचा पाठलाग करत प्रियाही तिथे पोहचते. तिथे पोहचल्यावर सायली देवाजवळ मधू भाऊंच्या सुटकेसाठी प्रार्थना करते आणि म्हणते. मधू भाऊंच्या केसमध्ये अर्जूनला यश दे ते खूप कष्ट घेतायेत अशी प्रार्थना सायली देवाजवळ करते.  यावेळी अर्जून फोनवर बोलण्यामध्ये व्यस्त असते. तो मंदिराबाहेर फोनवर बोलतना दिसतोय. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


प्रिया थोड्याशा अंतरावरच त्यांच्यापासून लपून दोघे नेमकं काय करतायंत हे पाहत असते. यानंतर सायली मंदिराबाहेर येते तितक्यात अर्जून तिला म्हणतो मलाही मंदिरात जायचं आहे. हे ऐकल्यनंतर सायलीलाही आश्चर्यच वाटतं.पुढे अर्जून देवाकडे प्रार्थना करतो आणि म्हणतो, जे काही सायलीने तुझ्याकडे मागितलं आहे ते सगळं तिला मिळू दे. मला खात्री आहे की, तिने स्वत:साठी काहीच मागितलं नसेल. तिच्या वाट्याचं दु:खही मला दे. अशी प्रार्था अर्जून सायलीसाठी देवाकडे करतो.


यानंतर सायली घरी परतण्याची तयारी सुरु करु लागते. मात्र अर्जूनची तशी अजिबात ईच्छा नसते. अर्जूनला सायलीसोबत वेळ घालवायचा असतो. तितक्यात हॉटेलमधून सायली-अर्जूनला पार्टीच आमंत्रण मिळतं. तर दुसरीकडे प्रियाची चिडचिड होत असते की, सायली अर्जूनविरोधात अजून कसलाच पुरावा सापडला नाही. तितक्यात पुर्णा आजीचा फोन येतो आणि ती त्यांना सांगते की, की ती राजस्थानमध्ये आहे. पुढे सायली-अर्जून पार्टीला जातात. तिथे गेल्यावर विशू काका (अर्जुनच्या वडिलांचे मित्र) या दोघांना डान्स करण्याचा आग्रह करतात. नाईलाजास्तव दोघं डान्स करतात. अर्जून हा क्षण खूप एन्जॉय करतो. पुढे सायलीच्या ड्रिंकमध्ये प्रिया अल्कोहोल मिसळते. त्यामुळे सायली पार्टीत खूप धिंगाणा घालते. अर्जुन तिला सावरण्याचा प्रयत्न करतो, पण ती नाचत, बडबडत राहते. माथेरान स्पेशल भाग पाहून हे प्रेम द्विगुणीत होईल याची खात्री आहे. तेव्हा पाहायला विसरु नका ठरलं तर मग रात्री ८.30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.