नवी दिल्ली : काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. पण त्याच्यासोबत असणाऱ्या इतर आरोपींना निर्दोष म्हणून मुक्त करण्यात आले. सलमानच्या जिप्सीमध्ये ७ जण होते. पुढे सलमान आणि सैफ, पाठीमागे सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम. त्याच्यामागे दुष्यंत सिंह आणि दिनेश गावरे असे दोघेजण होते. केवळ संशयाचा फायदा ६ जणांना मिळाला असे सांगितले जाते. पण त्यावेळी नेमकं काय झाल हे आपण जाणून घेऊया. दोन साक्षीदार पूनमचंद बिश्नोई आणि छोगाराम बिश्नोई यांनी ७ जणांना पाहिलं. त्यांनी सलमानला काळवीटाची शिकार करताना ओळखल. याप्रकरणी आणखी एक साक्षीदार शेराराम आणि काही जणांनी जिप्सीचा पाठलाग केला. त्यानंतर कायदेशीर कारवाई सुरू झाली.  कोर्टाच्या भाषेनुसार प्रदर्श पी १ म्हणजेच लिखित घटनेच्या आलेल्या अहवालानुसार मुलींचे नाव आणि वर्णन केल नाही. प्रदर्श पी ३ म्हणजे अहवालाच्या तिसऱ्या प्रतिमध्येही नाव आणि वर्णन नाहीए. सहाय्यक वन संरक्षक ललित कुमार बोडा यांच्या व्हिडिओग्राफीद्वारे घेतलेल्या जबाबातही तिघांची वर्णन अथवा नाव नाहीत.  


पूनमचंदचा जबाब 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूनमचंदच्या जबाबानुसार सलमान खानने शिकार केली हे स्पष्ट होतय. पण सलमानला हे करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा कोणता पुरावा यामध्ये सापडला नाही.  सलमानच्या जिप्सीत सर्वात मागे बसलेल्या आरोपी दुष्यंत सिंहच्या वकिलांनी साक्ष घेताना केलेल्या उलट प्रश्नांमधून दुष्यंत तिथे असल्याचेही स्पष्ट झाले नाही. पूनमचंद हा कोर्टामध्ये तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांनाही ओळखू शकला नाही. अंगापिंडाने तब्बू सारखी दिसणारी मुलगी असल्याचे म्हटले होते पण सोनाली बेंद्रेच्या नावाचा उल्लेख कुठे केला नाही.


शेरारामची महत्त्वाची साक्ष 


शेरारामची साक्ष महत्त्वाची होती ज्याने सलमानच्या जिप्सीचा पाठलाग केला. शेरारामनेही आपल्या साक्षीत एवढच सांगितलं की जिप्सीमध्ये २ पुरूष पुढे बसले होते. पाठच्या माणसाकडे बंदूकीसारख काही होतं. पुढे बसलेल्यांच्या हातात काही नव्हत. ३ मुली होत्या ज्यांना ओळखता आल नाही. सैफने सलमानला शिकार करण्यासाठी प्रवृत्त केल्याचेही स्पष्ट झाले नाही. म्हणून एकट्या सलमानलाच शिक्षा झाली.