मुंबई : Oscars2020  ऑस्कर पुरस्कार सोहळ्यांमध्ये जितकी रंगत या पुरस्कारांच्या रेड कार्पेटवर असते, तितकीच रंगत ही पुरस्कार सोहळ्यातील आणखीही काही विभागांमध्ये पाहायला मिळते. सेलिब्रिटींच्या येण्यापासून ते ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्यांना देण्यात येणाऱ्या गुडी बॅगमध्ये दडलंय तरी काय हे जाणण्यापर्यंत जगभरातील चाहत्यांना उत्सुकता लागलेली असते. उत्सुकता असणं सहाजिक आहे. कारण, ये मामला ऑस्करका है....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील वर्षी ऑस्करनध्ये देण्यात आलेल्या या गुडी बॅगमध्ये असणाऱ्या वस्तूंची एकूण किंमत जवळपास $100,000 इतकी होती. तर, यंदाच्या वर्षीसुद्धा अशाच काही अफलातून वस्तूंचा समावेश या गुडी बॅगमध्ये असणार आहे. ज्यामुळे तिची किंमत इतरांना थक्क करणार आहे. 


एजन्सीकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी ऑस्करच्या गिफ्ट बॅगमध्ये  Milliannaचे इयरिंग्स (कर्णफुलं), Hollowtipsचं 24 कॅरेट सोन्याचं पेन आणि सर्वसमावेशक अशी तब्बल 12 दिवसांची Scenic Eclipse ही $78,000 किमतीची क्रूझ सफर यांचा समावेश आहे.


आकर्षक अशा भेटवस्तुंव्यतिरिक्त या बॅगमध्ये Coda Signatureचे कॅनबिस इन्स्फ्युज्ड चॉकलेट, Hotsy Totsy Hausचं 24 कॅरेट सोन्यापासून बनवलेलं रॉयल चक्र बाथ बाँब, पर्पल ब्राझिलीयन क्ले आणि कोकोनट मिल्कचाही समावेश आहे. गुडी बॅगच्या निमित्ताने यापैकी कित्येक वस्तूंची नावं ही पहिल्यांदा ऐकायला मिळत आहेत. फक्त इतक्यातच ही गुडी बॅग भरली आहे, असं नाही. कारण, त्यामध्ये इतरही काही आकर्षक गोष्टी आहेत. ज्यामध्ये Muse  या ब्रँडचा मेडिटेशन हेडबँडही देण्यात आला आहे.


ऑस्करचं नामांकन मिळालेल्यांना यंदाच्या वर्षी दिल्या जाणाऱ्या गुडी बॅगमध्ये फार्म टू फोर्क नावाचे किट देण्यात येणार आहेत. ज्यामध्ये फास्ट बार, एसेन्स वनकडून देण्यात येणआरे अरोमा थेरेपीचे काही प्रोडक्ट्स, स्लीप सपोर्ट रोलर ब़ॉल, हनीम मिंट लिप बाम आणि बॉडी ऑईलही देण्यात आलं आहे.


बॅगमध्ये या वस्तू असल्याचंही म्हटलं जात आहे, ज्यामध्ये Officina Bernardiचं मून ब्रेसलेट, जॉन थोमॅन यांमी साकारलेलं stained-glass portrait, कॉकटेल आणि मॉकटेलची चव वाढवण्यासाठी 
 CBD Barkeepचं सिरप, Charabancचे लक्झरी कार फ्रेग्रन्स (कारमध्ये वापरण्याची सुगंधी द्रव्य किंवा अत्तर), Faro Cumplida या स्पेनमधील लाईटहाऊसमध्ये एका दिवसाचं वास्तव्य, ओल्ड स्पाईसचा अल्ट्रा स्मूथ डिओड्रंट , Waikiki Beachcomber hotelमध्ये पाच रात्रींचं वास्तव्यं अशा थक्क करणाऱ्या आणि अविश्वसनीय अशा भेटवस्तूंची बरसात ऑस्करच्या गुडी बॅगच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.