`सरी`च्या कलाकारांनी दिलं गरजूंना सरप्राईस
सध्या अनेक मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. समर वेकेशन म्हटलं की, सिनेमांच्या रिलीजची रांगच रांग लागते. यातलाच एक सिनेमा म्हणजे सरी सिनेमा. लवकरच सरी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मुंबई : सध्या अनेक मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. समर वेकेशन म्हटलं की, सिनेमांच्या रिलीजची रांगच रांग लागते. यातलाच एक सिनेमा म्हणजे सरी सिनेमा. लवकरच सरी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अजिंक्य राऊत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.सध्या या सिनेमातील कलाकारांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
'लाईफ इज फुल्ल ऑफ सरप्राइजेस अँड मिरॅकल्स'. या ओळीचा अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात एखाद्या निमित्ताने येतोच. हे सरप्राइजेस आणि मिरॅकल्स कधी चेहऱ्यावर हसूही आणतात तर कधी आसूही. असेच एक सुखद सरप्राईज नुकतेच 'सरी' चित्रपटाच्या कलाकारांनी दिले. मुंबई परिसरातील काही गरजुंना अन्नधान्याच्या वाटपाचे सरप्राईज देऊन त्यांनी गरजूंच्या चेहऱ्यावर हसू आणले. नुकताच हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला आहे.
ज्याप्रमाणे या कलाकारांनी या गरजूंना सुखद धक्का दिला तसाच सरप्राइजेस आणि मिरॅकल्सने भरलेला अशोका के. एस. दिग्दर्शित 'सरी' हा चित्रपट येत्या ५ मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. कॅनरस प्रॉडक्शन्स प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल आणि आकाश नागपाल निर्मित या चित्रपटात अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री, पृथ्वी अंबर, मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
चित्रपटातील कलाकारांनी फुटपाथवर राहणाऱ्या गरजूंना त्यांच्या नकळत अन्नधान्यांची भरलेली पिशवी दिली. ज्या वेळी ही गोष्ट त्यांना कळली, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान देणारा होता. याबद्दल अभिनेता अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर आणि रितिका श्रोत्री म्हणते, '' प्रत्येकाच्या आयुष्यात काही अपेक्षित, अनपेक्षित चमत्कार घडतच असतात. आज यांना सरप्राईस देऊन त्यांच्या चेहऱ्यावरील ख़ुशी पाहून आम्हालाही खूप आनंद झाला.''
प्रेमाच्या सुरूवातीच्या सोनेरी क्षणांची आठवण करून देणाऱ्या या गाण्याचे सुरेल बोल मनाला भिडणारे असून संगीतही अतिशय श्रवणीय आहे. येत्या ५ मे रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कॅनरस प्रॉडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखन, संकलन अशोका के. एस. यांनीच केले असून येत्या ५ मे रोजी 'सरी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
याचबरोबर या सिनेमात कन्नड, तुल्लू, तामिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवल्यानंतर पृथ्वी अंबर आता मराठी चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.