बॉयफ्रेंडसोबत इंटीमेट व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री गायब; आता पोस्ट शेअर करत म्हणाली...
इंटीमेट सीन व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री म्हणते...
मुंबई : झगमगत्या दुनियेची जशी एक बाजू चांगली आहे, त्याचं प्रमाणे एक बाजू मात्र धोकादायक आहे. कास्टिंग काऊच, वन नाईट स्टॅन्ड अशा अनेक गोष्टीमुळे कलाविश्वाला डाग लागला आहे. अभिनेत्रींना अनेक वाईट प्रसंगांचा सामना करावा लागला आहे. ज्यामध्ये भोजपुरी अभिनेत्री तृषा कर मधुचा देखील (Trisha Kar Madhu) समावेश होता. काही दिवसांपूर्वी तृषाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्या व्हिडिओमुळे सर्वत्र फक्त तृषाच्या व्हिडिओची चर्चा होती.
काही दिवसांपूर्वी तृषा आणि तिच्या बॉयफ्रेन्डचा एक प्रायव्हेट व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. तेव्हा तृषाने सर्वांना तो व्हिडिओ डिलिट करण्यासाठी विनंती केली . पण तृषा आणि बॉयफ्रेन्डचा व्हिडिओ सर्वत्र वाऱ्यासारखा पसरला. त्यानंतर तृषा काही दिवसांसाठी सोशल मीडियापासून आणि चित्रपटांपासून दूर होती. पण आता तृषाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'विजय निश्चित असेल तर घाबरट व्यक्ती देखील लढू शकतो... पराक्रमाची खात्री नसून देखील मैदान सोडत नाहीत. त्यांना शूर म्हणतात.' सध्या तृषाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
तृषाबद्दल सांगायचं झालं तर ती भोजपुरी विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. पण त्या एका इंटिमेट व्हिडिओमुळे तिच्या करियरला ब्रेक लागला आहे.