मुंबई : अभिनेत्री मनोज बाजपेयी स्टारर 'फॅमिली मॅन 2'  सीरिजला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला आहे. शोच्या प्रत्येक सीझनमध्ये त्याने भन्नाट भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केलं आहे. त्याच्या अभिनयाचं कौतुक फक्त चाहत्यांनी नाही तर समिक्षकांनी देखील केलं. सीरिजमध्ये मनोजनंतर केंद्रबिंदू ठरती ती म्हणजे त्यांनी ऑनस्क्रिन मुलगी. सीरिजमध्ये अभिनेत्री अश्र्लेषा ठाकुरने धृती या मुलीची भूमिका साकारली होती. भूमिकेनंतर  अश्र्लेषाच्या चाहत्यांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. एवढंच नाही तर तिला आता लग्नासाठी अनेक प्रस्ताव देखील येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासंबंधी अश्र्लेषा एका मुलाखतीत खुलासा केला आहे.   अश्र्लेषाने सांगितलं की, दिग्दर्शकांच्या मेसेजमुळे मला अनेक लग्नाचे प्रस्थाव येत आहेत. लोक त्यांना अनेक स्वीट मेसेज पाठवत आहेत.  मी सध्या मला मिळत असलेले अटेंशन एंजॉय करत आहे. फॅमिली मॅनच्या पहिल्या सिझनमध्ये  अश्र्लेषाला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. पण 'फॅमेली मॅन 2'मध्ये तिची भूमिका दमदार होती.



अश्र्लेषा ठाकुरने सीरिजमध्ये कल्याण (अभय वर्मा)सोबत रोमँटिक सीन करताना दिसली. या सीनच्या चित्रीकरणादरम्यान आश्र्लेशा नर्वस होती. अश्र्लेशा म्हणाली की, 'माझ्यासाठी हे सर्व नवं होतं. मला माझ्या भूमिकेत मॅच्योरिटीची फार गरज होती. सीनसाठी मी अनेक रोमँटिक सीरिज पाहिल्या. रिसर्च केलं. किसिंग सीन शूट टेक्निकल होतं. मला मझ्या दिग्दर्शकांवर पूर्ण विश्वास होता.'


आश्लेषा ठाकूरने बर्‍याच जाहिरातींमध्ये काम केले आहे. 2017 साली अश्र्लेशाने 'शक्ती' मालिकेच्या माध्यमातून कलाविश्वात पाऊल ठेवलं. पण फॅमेली मॅनमुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली.