पुण्यातील 300 वर्ष जुना मस्तानी तलाव; इथूनच निघतो शनिवारवाड्यात जाणार रहस्यमयी भुयारी मार्ग

पुण्यातील 300 वर्ष जुना मस्तानी तलाव हे नाव कसे पडले याची कहानी देखील तितकीच रंजक आहे.

| Oct 07, 2024, 23:19 PM IST

Pune Mastani Talav :  पुणे हे ऐतिहासिक वारसा लाभलेला शहर आहे.  यापैकीच एक आहे पुण्यातील मस्तानी तलाव आहे. 300 वर्ष जुन्या मस्तानी तलावाचा इतिहास फारचं रंजक आहे. इथूनच शनिवारवाड्यात जाणार रहस्यमयी भुयारी मार्ग निघतो. जाणून घेऊया  मस्तानी तलावाविषयी. 

1/7

पुणे आणि सासवडला जोडणाऱ्या दिवे घाटाच्या पायथ्याशी  मस्तानी तलाव आहे. 

2/7

मस्तानी तलाव हे पुण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. 

3/7

मस्तानी तलाव परिसरातुन  शनिवारवाड्यात जाणार रहस्यमयी भुयारी मार्ग आहे. 

4/7

 बाजीराव पेशवे आणि त्यांची दुसरी पत्नी मस्तानी यांची येथे नेहमी भेट व्हायची. यामुळेच या तलावाला मस्तानी तलाव असे नाव पडल्याची रंजक कथा आहे.   

5/7

इ.स. 1720 मध्ये मस्तानी तलावाची निर्मिती करण्यात आली. 

6/7

या तलावाच्या जवळ शिवमंदिर व तटावर गणेशमंदिर आहे.मस्तानी तलाव तब्बल 14  एकर क्षेत्रात पसरलेला आहे.  बाजूच्या हिरव्यागार टेकड्यां तलावाच्या सौंदर्यात भर घालतात.

7/7

पुणे शहरापासून 22 किमी अंतरावर वडकी गावाजवळचा हा तलाव आहे. पूर्वी हा तलाव वडकी तलाव नावाने ओळखला जात होता.