Mumbai : नेहा कक्कर ही तिच्या गाण्यांमुळे प्रचंड प्रसिद्ध आहे. तिला तिच्या गाण्यासाठी तर ओळखले जातेच पण तिला तिच्या भावनिक स्वभावासाठी चांगलेच ओळखले जाते. ती अनेक शो वर काही कारणांसाठी रडल्यामुळे नेहाला अनेकदा ट्रोल देखील केले जाते. कधी कुणाचा परफॉर्मन्स पाहून तर कधी कुणाची वेदनादायक कहाणी ऐकून नेहा रडते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या नेहा कक्कर इंडिया आयडॉल 13 ची जज आहे. इंडिया आयडॉलच्या सेटवर असे अनेक प्रसंग आले आहेत की नेहा भावूक होऊन रडली आहे. नुकतेच पुन्हा एकदा असे काही घडले की नेहा कक्करला आपले अश्रू आवरता आले नाहीत. वास्तविक, गुरुवारच्या एपिसोडमध्ये गोविंदा, त्याची पत्नी सुनीता आहुजा आणि मुलगी टीना आहुजा शोमध्ये दिसले होते. (The Bollywood actors words brought tears to Neha eyes nz)


आणखी वाचा - विकी कौशलच्या 12 वर्षांच्या भाचीसोबत करण कुंद्राचा रोमान्स, Video पाहून तुम्हाला येईल संताप


 


हिरो नंबर वन अशी ओळख असणाऱ्या या बॉलिवूड स्टार गोविंदाचे लाखो चाहते आहेत. अलीकडेच दिवाळीच्या खास मुहूर्तावर गोविंदा आपल्या कुटुंबासह इंडिया आयडॉल 13 च्या सेटवर पोहोचला, तिथलं वातावरण अगदीच छान होते. तुम्हाला माहितेय का  नेहा कक्कर ही गोविंदाची मोठी फॅन आहे त्याला पाहताच ती आनंदाने सेटवर उड्या मारु लागते. नेहाने गोविंदाच्या कुटुंबाचे स्टेजवर स्वागत केले. सोनी एंटरटेनमेंट चॅनलच्या इंस्टाग्राम हँडलवर शोचा नवीन प्रोमो रिलीज करण्यात आला आहे, ज्यामध्ये दिवाळी स्पेशल एपिसोडची झलक दाखवण्यात आली आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आणखी वाचा - ज्याचं कोणी नाही त्याची तापसी पन्नु, Outsiders साठी अभिनेत्रीनं ठेवली Grand Diwali Party!


 


 


गोविंदाची पत्नी सुनीता नेहा कक्करला सांगते की, 'तू गोविंदाची आवडती गायिका आहेस आणि तो तुझा चाहता आहे.' त्यानंतर गोविंदाही नेहाची जोरदार प्रशंसा करतो. गोविंदा म्हणतो, 'चांगल्या कलाकाराला अशा ह्रदयाची गरज असते की, कुणाचे दु:ख बघून तुमचेही अश्रू बाहेर येतात.' सुनीता आहुजा म्हणाली, 'माझं तुझ्यावर प्रेम आहे नेहू. तो खूप भावनिक आहे. गोविंदाच्या तोंडून तिचे कौतुक ऐकून नेहा कक्कर खूप भावूक होते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. त्यानंतर नेहाला रडताना पाहून गोविंदा तिचे अश्रू पुसताना दिसत आहे. नेहा म्हणते, 'ज्याला पाहून मी मोठी झाले, आज ती व्यक्ती माझी फॅन आहे. आज मी खरोखरच सुपरस्टार झालो.