विकी कौशलच्या 12 वर्षांच्या भाचीसोबत करण कुंद्राचा रोमान्स, Video पाहून तुम्हाला येईल संताप

करणचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.  

Updated: Oct 21, 2022, 12:25 PM IST
विकी कौशलच्या 12 वर्षांच्या भाचीसोबत करण कुंद्राचा रोमान्स, Video पाहून तुम्हाला येईल संताप title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundra) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. करण कुंद्राला बिग बॉसमुळे खरी ओळख मिळाली. करण कुंद्रा आणि तेजस्वि प्रकाश यांच्यातील रोमान्सनं बिग बॉसचं 15 वम सीझन चर्चेत होतं. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर ही जोडी सतत चर्चेत आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. दरम्यान, करणचा एक व्हिडीओ सध्या समोर आला असून तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून तो ट्रोल होतं आहे. 

करणनं नुकताच एक व्हिडीओ शूट केला आहे. 'अखियां' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडीओत करण एका मुलीसोबत रोमान्स करताना दिसत आहे. ही मुलगी कोणी दुसरी नसून 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटात विकी कौशलच्या भाचीची भूमिका साकारणारी रिवा अरोरा आहे. 

या व्हिडीओत करण हा 12 वर्षीय रिवासोबत रोमान्स करत असल्याचे दिसते. या व्हिडीओत रिवानं अशा मुलीची भूमिका साकारली आहे जी आपल्या बॉयफ्रेंडचा विश्वासघात करते आणि करण कुंद्राबरोबर रोमान्स करते. या व्हिडीओमध्ये वयानं एवढ्या लहान असलेल्या मुलीसोबत रोमान्स केल्यामुळे करणवर नेटकरी संतापले आहेत. (Karan Kundra Romancing With 12 Yearl Old Riva Arora In Music Video Gets Trolled) 

करणला ट्रोल करत नेटकऱ्यांनी फक्त करणच नाही तर रिवाच्या पालकांवरही संताप व्यक्त केला आहे. नेटकऱ्यांच म्हणणं आहे की रीवा अजूनही लहान आहे आणि तिला अशा प्रकारे ऑनस्क्रीन लैंगिक किंवा रोमँटिक भूमिकांमध्ये दाखवणं योग्य नाही. तर काही नेटकऱ्यांनी 38 वर्षीय करणला 12 वर्षीय रिवासोबत रोमान्स करणं शोभत नाही असे म्हटले आहे. वयानं लहान असलेल्या मुलीसह अशाप्रकारे काम करताना तुला लाज वाटत नाही का? असा सवाल देखील नेटकऱ्यांनी करणला केला आहे.

इतकंच नाही तर लोक रिवाचं वय आणि तिच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. रिवानं वयाने मोठे दिसण्यासाठी काही इंजेक्शन्स घेतली आहेत का? असा प्रश्नही नेटकऱ्यांना पडला आहे. रिवा अवघ्या 12 वर्षांची आहे, पण तिचं हे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळे हैराण झाले आहेत.