मुंबई : 'द क्रॉनिकल्स ऑफ नार्निया' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला इतकी वर्षे उलटूनही प्रेक्षकांमध्ये त्याबाबत असणारी उत्सुकता आणि कुतूहल कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. एक अभिनेत्री म्हणून जॉर्जी हेन्लीनं कमालीची प्रसिद्ध झाली. या चित्रपटात जॉर्जीयानं लुसी ही भूमिका साकारली होती. या प्रसिद्धीमागे जॉर्जीयाला अशाही विचित्र आजाराचा सामना करावा लागला होता ज्याचा विसर तिला काही केल्या पडत नव्हता. अलीकडेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिनं खुलासा केला की तिला नेक्रोटाइझिंग फॅसिटायटिस हा आजार झाला होता. हा आजार म्हणजे ती व्यक्ती स्वत: ची त्वचा खाते. (flesh-eating disease)
 
जॉर्जी याला वयाच्या 18 व्या वर्षी हा आजार झाला. याविषयी सांगत जॉर्जीयानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. जेव्हा मी अठरा वर्षांचे होते आणि माझ्या विद्यापीठाच्या सहाव्या आठवड्यात, मला नेक्रोटायझिंग फॅसिटायटिसचा संसर्ग झाला, एक दुर्मिळ आणि दंडनीय संसर्ग ज्याने जवळजवळ माझा जीव घेतला आणि माझ्या संपूर्ण शरीरात त्याचा भयानक परिणाम झाला. माझ्या डावा हात आणि दंड शरीरापासून वेगळं होण्यापासून वाचवण्यासाठी एक शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्यामुळे Skin Tissue ना इजा पोहोचून ते व्रण आणि चट्टेही तसेच राहिले, असे जॉर्जीया म्हणाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉर्जीया पुढे म्हणाली,'मला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बरं होण्यासाठी बराच वेळ लागला, परंतु मला आशा आहे की एक दिवस येईल जेव्हा जे घडलं त्याबद्दल बोलण्यासाठी योग्य वेळ येईल. आज याला सुरुवात झाली. गेली नऊ वर्षे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातील माझ्या जखमांबद्दल उघड केलं नाही, जेव्हा जमेल तेव्हा हातावरही मेकअप आणि जेव्हा जेव्हा माझे फोटो काढण्यात यायचे तेव्हा लॉंग स्लिव्हस टी-शर्ट, ट्राऊझर्स परिधान केलं. शिवाय मी हात खिशात घालायचे.' 



पुढे जॉर्जीया म्हणाली, 'मी ज्या इंडस्ट्रीचा भाग आहे तो अनेकदा सौंदर्याच्या अवतिभोवत फिरणारा आहे आणि मला भीती वाटायची की माझे चट्टे मला काम मिळण्यापासून रोखतील. सत्य हे आहे की ‘परिपूर्णता’ नावाची कोणतीही गोष्ट नाही, परंतु मी अजूनही वेगळेपणाची लाज बाळगून जगले आहे, लहान वयात माझ्या करिअरची सुरुवात करताना आलेल्या अपेक्षांमुळे मी वाढले आहे.'


या विषयी सविस्तर सांगताना जॉर्जीया म्हणाली, 'मी अॅडनब्रुकच्या हॉस्पिटलचे त्यांच्या अपवादात्मक काळजीबद्दल आभार मानू इच्छितो. माझ्या कुटुंबाचे आणि मित्रांचे मला त्यांच्या कठीण काळात कायमचे प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानायचे आहेत, विशेषत: माझे पालक ज्यांनी कितीही त्रास असले तरीही माझ्याबरोबर प्रत्येक वादळाचा सामना केला. माझे एजंट आणि गेल्या नऊ वर्षात ज्या लोकांनी मला काम दिले आहे, ज्यांनी माझ्या जखमांना कधीही समस्या म्हणून पाहिले नाही आणि एक व्यक्ती आणि अभिनेत्री म्हणून मी कोण आहे याचा आदर केला त्यांचे आभार. हे वाचणार्‍या आणि मला आणि माझ्या कामाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे शेवटी आभार, याचा अर्थ तुम्हाला जेवढ माहितीये त्याहून जास्त जास्त आभार. मला खात्री आहे की मी भविष्यात माझ्या अनुभवांबद्दल अधिक बोलेन परंतु आज मला खूप आनंद झाला आहे की, खूप दिवसांनी पहिल्यांदाच, शेवटी मी मोकळे झाले.' दरम्यान, जॉर्जीयानं असं म्हटलं नाही की तिनं स्वत: लचके घेतले.