मुंबई : अभिनेता श्रेयस तळपदेने छोट्या पडद्यावर कमबॅक करत झी मराठीवरील माझी तुझी रेशीम गाठ यामध्ये दिसला आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून अभिनेता श्रेयस तळपदे खूप वर्षांनंतर मालिकांमध्ये झळकला आहे. श्रेयससोबत अभिनेत्री प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहे. या जोडीने पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छोट्या पडद्यावर या नव्या जोडीला प्रेक्षक प्रचंड पसंती देतात यात काहीच शंका नाही. पण आज या मालिकेतील एका पात्राची धक्कादायक माहिती समोर येत आहे. माझी तुझी रेशीम गाठ मालिकेतील परिच्या मामीची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वाती देवल संबधित एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. जे पाहून चाहत्यांना धक्का बसत आहे. 


छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयातून जादू करणारी ही अभिनेत्री सध्या रुग्णालयात दाखल आहे. अभिनेत्रीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही माहिती तिच्या चाहत्यांना मिळाताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या शस्त्रक्रियाची माहिती खुद्द स्वातीनं सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. 


स्वातीनं हॉस्पिटल मधील फोटो शेअर करत  लिहिलंय की, ''नमस्कार मित्रांनो, कालच एक छोटी सर्जरी झाली. आता मी बरी आहे. स्वामींची कृपा आशीर्वाद आणि तुम्हा सर्वांचे प्रेम यामुळेच हे शक्य झालं. स्वामी दत्त कृपा तर वेळोवेळी मिळते मला पण विशेष म्हणजे या वर्षी जाणत आहे. खूप लोकांचे आशीर्वाद मिळालेत. हे पुण्य असं कामी येतं. मी मनापासून तुमची आभारी आहे. अजून फक्त एक आठवडा काळजी घ्यायची आहे.''


स्वातीनं तिच्या पुढे पोस्टमध्ये लिहिलं की, ''पणं खरंच आपणच आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. दुर्लक्ष करू नका. वेळच्या वेळी उपचार करायला हवे. आपल्या शरीराला रोजच्या जगण्यात पौष्टिक, सकस आहाराची गरज आहे. पूर्वी जंक फूड म्हणजे आई रोजच्या जेवणाव्यतिरिक्त जे बनवायची ते असायचं. म्हणजे फक्त रविवारी पोहे, उपमा, डोसे, फोडणीची पोळी वगैरे. पण या सर्व गोष्टी घरीच बनवलेल्या असायच्या.


''आज लोक घरी जेवण करायचा कंटाळा करतात आणि बाहेरून आणतात. मोठे झालो अतिरिक्त बुद्धी आली की मग वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधले पदार्थ मित्र मैत्रिणीबरोबर चाखायची सवय लागते आणि मग ती जात नाही. कधीतरी हे ठीक आहे. पण चटकदार खायची जिभेची सवय जाऊच शकत नाही. आपल्या शरीरासाठी स्वयंपाक करण्याचा कंटाळा कसला हो. 


मी आजही शूटला स्वतः डबा नेते पण मी प्रचंड फुडी असल्यानं विविध रेस्टॉरंटमधले पदार्थ खाऊन ते घरी बनवण्याचा प्रयत्न करण्यासाठी तिथल्या शेफना भेटून विचारून यायची सवय. त्यामुळेच हे सगळं झालं. बरं जेवणाच्या वेळा नियमीत नाहीत म्हणूनही गे सगळं झालं. कुठे थांबायचं, शरीरचे लाड किती पुरवायचे हे आपल्याला स्वतःला समजयला हवं.'' 



या पोस्टच्या पुढे अभिनेत्रीने रुपाली भोसलेचे आभार मानले आहेत. काही दिवसांपूर्वी मैत्रीण रुपाली भोसलेची पोस्ट वाचली. ती वाचून धैर्य आलं आणि लगेच निर्णय घेतला. धन्यवाद. या पोस्टमध्ये स्वातीनं तिची ज्या रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली तिथल्या डॉक्टरांचे, नर्स आणि सर्व कर्मचाऱ्याचे आभार मानले आहेत. पोस्टच्या शेवटी स्वातीनं तिचा नवरा आणि संगीतकार तुषार देवल याचेही आभार मानले आहेत.