मुंबई : काही दिवसांपूर्वी विनोदी भयपट अर्थातच  हॉरर-कॉमेडी या जॉनरच्या 'झोंबिवली' या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते. चित्रपटाचे नाव आणि लक्षवेधी पोस्टर यामुळे आतापासूनच या चित्रपटाची चर्चा रंगली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'झॉम्बी' बाबतचे कुतूहल पाहता मराठी चित्रपट वर्तुळात‌ या धाटणीच्या चित्रपटाच्या कथानकाबाबत कमालीची उत्सुकता आहे. मराठीत झॉम्बी पाहायला नक्कीच सर्वांना आवडेल आणि त्यांना पाहण्यासाठी उत्सुकता देखील वाढली असेल. आता प्रेक्षकांना झॉम्बीची छोटीशी झलक पाहायला मिळणार आहे कारण 'झोंबिवली' चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. 



आतापर्यंत प्रेक्षकांनी हिंदी आणि इंग्रजी सिनेमात झॉम्बीज् पाहिले आहेत, पण 'झोंबिवली'च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठीमध्ये पण आता झॉम्बीज् पाहायला मिळणार आहेत.


चित्रपटाचं हे मोशन पोस्टर हे पाहता या हटके कथानक रसिकांमध्ये उत्सुकता वाढवणार यात शंका नाही. झॉम्बींचे व्हिज्युअल, सुप्रसिध्द संगीतकार ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी दिलेले बॅकग्राऊंड म्युझिक, एकंदरीत मोशन पोस्टरचा इफेक्ट या सर्व गोष्टींसाठी प्रेक्षकवर्गांकडून पुन्हा एकदा चित्रपटाचे कौतुक होणार हे नक्की.



सारेगम प्रस्तुत 'झोंबिवली' चित्रपटाची निर्मिती Yoodlee Films यांनी केली आहे. तर सुप्रसिध्द सिने दिग्दर्शक आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटात अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २०२१ ला प्रदर्शित होणार आहे.