Raju Srivastava Hospitalized : राजू श्रीवास्तव यांची प्रकृती नाजूक, चाहत्यांकडून प्रार्थना
कॉमेडियन राजू श्रीवास्तवला (Raju Srivastava) 10 ऑग्स्टला हृदयविकाराच्या झटक्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Raju Srivastava Hospitalized : कॉमेडियन राजू श्रीवास्तवला (Raju Srivastava) 10 ऑगस्टला हृदयविकाराच्या झटक्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कॉमेडियन आणि अभिनेता असलेल्या राजू श्रीवास्तल यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ज्यांनी नेहमीच भरभरुन आणि खळखळून हसवलं त्यांच्यामुळेच आता त्यांचे चाहचे हे चिंतित आहेत. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी सोशल मीडियावर त्यांचे चाहते पोस्ट करतायेत. तसेच उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतायेत. (the great indian laughter challenge fame comedian star raju srivastava health critical fans pray form his speedy recovery)
राजू श्रीवास्तव यांच्या हृदयाचा एका भागात 100 टक्के ब्लॉक होता. यानंतर त्यांच्यावर एंजियोप्लास्टी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव सध्या व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. राजू श्रीवास्तव 10 ऑगस्टला नेहमीप्रमाणे वर्कआऊट करत होते. या दरम्यान धावता धावता ते कोसळले. यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आलं.
'द ग्रेट इंडियन लॉफ्टर चैलेंज'मुळे लोकप्रियता
राजू श्रीवास्तव यांना 'द ग्रेट इंडियन लॉफ्टर चैलेंज'च्या पहिल्या हंगामातून त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली. या शोमुळेच ते घराघरात पोहचले. त्यानंतर त्यांना अनेक सिनेमांमध्ये संधी मिळाली. 'बाजीगर', 'बॉम्बे टु गोवा', 'आमदनी अठन्नी खर्चा रुपया' यासारख्या सिनेमांमध्ये ते झळकले. यानंतर राजू बिग बॉसच्या तिसऱ्या हंगामातही सहभागी झाले होते.