चारचौघात आई म्हटलं की चिडायची, स्वतःच्या मुलीला मारून टाकलं; आता सीरिज येतेय!
The Indrani Mukherjea Story Buried Truth : शीना बोरा मर्डर केस प्रकरणावर आधारीत द इंद्राणी मुखर्जी ही डॉक्यु सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
The Indrani Mukherjea Story Buried Truth : 2012 मध्ये ज्या मर्डर केसनं सगळ्यांना हादरून सोडलं होतं. ती केस म्हणजे आई आणि मुलीच्या नात्याला काही तरी वेगळंच वळण दिलं होतं. या हत्येनं सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. या केसमध्ये मुख्य आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीवर 25 वर्षांची लेक शीना बोराची हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. हत्येच्या तीन वर्षांनंतर इंद्राणी आणि त्यांच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आलं होतं.
या मर्डर केसला 12 वर्ष झाली आहेत. मात्र, अजूनही या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. आता याच मर्डर केसवर नेटफ्लिक्स हे ओटीटी प्लॅटफॉर्म एक डॉक्युमेंट्री घेऊन येणार असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर सगळ्यांना आता ही केस जवळूण जाणून घेता येईल. नेटफ्लिक्सवर येणारी ही डॉक्यु सीरिज 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी बरीड ट्रुथ' या नावानं प्रदर्शित होणार आहे. तर या डॉक्युमेंट्रीचं पहिलं पोस्टर हे आज 29 जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यात आलं. पोस्टरमध्ये इंद्राणीचा अर्धा चेहरा दिसतोय. हे पोस्ट शेअर करत कॅप्शन देण्यात आलं की एक प्रकरण ज्यानं संपूर्ण देशाला हादरून सोडलं होतं, ज्याची सुरुवात एक कुटुंब आहे. ही डॉक्यु सीरिज 23 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
काय पाहायला मिळणार?
या डॉक्यू-सीरिजमध्ये इंद्राणी मुखर्जी यांनीच त्यांच्या मुली विरोधात कसा कट रचला हे उघड होणार आहे. तर या सीरिजमध्ये इंद्राणी मुखर्जी यांची मुलं म्हणजेच विधी मुखर्जी आणि मिखाइल बोला, जेष्ठ पत्रकार आणि वकील यांच्याकडे असलेली माहिती आणि थोडक्यात सगळ्याच डिटेल पाहायला मिळणार आहेत. या डॉक्यू सीरिजचे दिग्दर्शन शाना लेवी आणि उराज बहल यांनी केले आहे. या सीरिजमध्ये अनेक उलगडे यात होणार आहेत, ज्याविषयी आजपर्यंत कोणालाही माहित नव्हतं.
2012 मध्ये मुंबई शीना बोराची हत्या करण्यात आली. खरंतर तीन वर्षात या केसमधील गूढ समोर आले नाही. त्यानंतर 2015 मध्ये शीनाची आई इंद्राणी मुखर्जीला अटक करण्यात आली होती. इंद्राणी यांची दोन लग्नं झाली होती. तिच्या पहिल्या लग्नानंतर तिला शीना बोरा झाली होती आणि त्यानंतर तिनं पीटर मुखर्जीशी लग्न केलं होते, जे टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव होते. सुरुवातीला इंद्राणीनं शीनाला तिची बहीण म्हटलं आणि नंतर ती तिची मुलगी असल्याचे कबूल केले.
हेही वाचा : 'आमची अब्रू जाईल अशा शोमध्ये परत जाणार नाहीस... सासूबाई असं म्हणताच अंकितानं दिलं सडेतोड उत्तर
6 वर्ष 9 महिने भायखळ्याच्या तुरुंगात राहिल्यानंतर 2022 मध्ये 2 लाख रुपये देत जामिनावर सुटली होती. त्याआधी 2021 मध्ये इंद्राणीनं दावा केला होता की त्यांची लेक जिवंत आहे. त्यांच्या एका वकीलनं शीनाला कश्मिरमध्ये पाहिलं. सुटका मिळाल्यानंतर इंद्राणीनं या प्रकरणावर पुस्तक लिहिलं आणि तिची बाजू मांडली. आजय या प्रकरणाचं गूढ समोर आलेलं नाही.