मुंबई : बॉलिवूडमध्ये वेळोवेळी घराणेशाहीची चर्चा होत असते. अनेकदा फिल्मी दुनियेत आतील कलाकारांपेक्षा बाहेरील स्टार्सकडे कमी लक्ष दिलं जातं हे समोर आलं आहे. ज्याबद्दल इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी आपलं मत मांडलं आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री यामी गौतमनेही चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत घराणेशाहीवर भाष्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामी चाहत्यांसाठी 'आस्क मी एनिथिंग सेशन' ठेवलं
अलीकडेच यामी गौतमने तिच्या चाहत्यांसोबत आस्क मी एनीथिंग सेशन केलं होतं. अभिनेत्रीने ट्विटरवर लिहिलं, 'नमस्कार मित्रांनो, ट्विटरवर बोलून खूप दिवस झाले. चला संध्याकाळी 6 वाजता  समस्यांबद्दल बोलूया'. अशा परिस्थितीत, ट्विटरवर एका चाहत्याने अभिनेत्रीला बॉलीवूडवर घराणेशाहीमुळे होणाऱ्या परिणामाबद्दल प्रश्न विचारत लिहिलं, 'तुम्हाला असं वाटत नाही की, जे लोकं बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आहेत ते बिगर फिल्मी पार्श्वभूमीतून आलेले प्रतिभावान चेहरे पाहू शकतात. मागे ढकलणं? तुम्हालाही याचा सामना करावा लागला आहे का?'


यामी गौतम नेपोटिझमवर उघडपणे बोलली
यामी गौतमने या चाहत्याला सडेतोड उत्तर दिलं आणि सांगितलं की, आता बॉलिवूडमध्ये बदल होत आहेत. यामी लिहिलं, 'जे होऊन गेले, ते होऊन गेले. आपण सर्वांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बॉलीवूडला एक चांगली जागा बनवायला हवी. चांगले चित्रपट बनले पाहिजेत.


आपण कोणत्याही पार्श्वभूमीतून आलो तरीही प्रतिभेला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि मला वाटतं की बदल हळूहळू होत आहे. याशिवाय यामीने बॉलीवूड आणि साऊथच्या चित्रपटांवर बोलताना 'आपण आपल्या प्रेक्षकांना लक्षात ठेवून असेच चित्रपट बनवले पाहिजेत', असंही सांगितलं.



यामी गौतम सुरुवातीपासूनच इंडस्ट्रीमध्ये घडणाऱ्या गोष्टींबद्दल स्पष्टपणे बोलते. प्रत्येक मुद्द्यावर तिने आपलं मत उघडपणे मांडलं आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, यावेळी अभिनेत्रीकडे अनेक चित्रपट आहेत. यामध्ये 'लॉस्ट', 'ओएमजी 2' आणि 'धूम धाम' सारख्या चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे.