The Kapil Sharma Show: द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma show) हा लवकरच नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर येणार आहे. गेली कित्येक वर्षे या शोनं देशभरातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. आणि त्याचसोबतच या शोमधल्या कलाकरांनीही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या शोमधून काही कलाकार हे बाहेर पडले आहेत तेव्हा आता या शोमध्ये काही नवीन कलाकार येण्याची अपेक्षा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच शोमध्ये आपल्या विनोदशैलीनं प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री सुगंधा मिश्राचा (Sugandha Mishra) नुकताच एक व्हिडीओ इन्टाग्रामवरून व्हायरल झाला आहे. आपल्या या नव्या व्हिडीओनं सुगंधाने इंटरनेटवर नुसता धुमाकुळ घातला आहे. 


सुनील ग्रोवर, कृष्णा अभिषेक तसेच सुंगधा मिश्रा यांच्यासह अनेक स्टार्सनी कपिलच्या हा लोकप्रिय शो सोडला आहे. हे सर्वजण कपिलच्या शोपासून वेगळे झाले असले तरी सर्वजण इतर प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याची बातमी समोर आली आहे. त्यातील काही सोशल मीडियावरून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. 


कपिलच्या शोमध्ये शिक्षिकेची (Teacher) भूमिका साकारणारी सुगंधा मिश्रा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. सुगंधा तिच्या फोटोंशिवाय फनी व्हिडिओ आणि रील्स बनवून तिच्या चाहत्यांना हसवते. पण नुकताच सुगंधाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये सुगंधा सुरुवातीला खूपच क्यूट दिसतेय पण तिचा इन्टाग्रामवरील फिल्टर केलेला चेहरा पाहून तुम्हालाही भिती वाटल्याशिवाय राहणार नाही. 


पण घाबरू नका तुम्हाला हा व्हिडीओ पाहून नक्कीच मजा येईल. 


काय आहे व्हिडीओत?  - सुगंधाने एक हटके व्हिडीओ बनवला आहे ज्यात ती प्रेक्षकांना विचारते जेव्हा तुमचा क्रश (Crush) क्रश तुम्हाला फिल्टरसह पाहतो... यानंतर सुगंधाने आपला चेहरा तिच्या हातांनी लपवला आणि पुढच्याच क्षणी जेव्हा तिने हात काढला तेव्हा तिच्या चेहऱ्याचं रूपचं पालटलं. सुगंधा चक्क एका म्हतारी बाईसारखा दिसू लागली. 


हा व्हिडीओ मुळात असा संदेश देतो की एरवी तुम्ही नट्टपट्टा करून बाहेर फिरता, लोकांमध्ये वावरता. परंतु जर तुमचा कोणी क्रश तुमच्या आजूबाजूला असेल आणि त्यानं जर तुम्हाला मेकअपशिवाय पाहिलं तर तुम्ही स्वतःला म्हाताऱ्या बाईप्रमाणे त्याला दिसलात की काय, असा समज करून घेता.


या व्हिडीओवर सुगंधाचे फॅन्स खुपच हसत आहेत आणि त्यावर मजेदार कमेंट्स करत आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सुगंधा कपिलच्या शो 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' व्यतिरिक्त 'द कपिल शर्मा शो', झी कॉमेडी शो, द ड्रम कंपनीमध्ये दिसली आहे. सुगंधाने अनेक रिअॅलिटी शो देखील होस्ट केले आहेत. याशिवाय अभिनेत्री एक उत्तम गायिका देखील आहे.