Adah Sharma Hospitalized: यावर्षी आलेला 'द केरला स्टोरीज' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. या चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा हिच्याबाबत मोठी अपडेट समोर येते आहे. आपल्या एका चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तिच्या चाहत्यांना तिच्याबद्दल काळजी वाटू लागली असून ती लवकरच बरी व्हावी म्हणून तिच्यासाठी प्रार्थनाही करायला सुरूवात केली आहे. अदा शर्मा ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. ती आपले असे अनेक व्हिडीओज हे इन्टाग्रामवर शेअर करताना दिसते. मध्यंतरी तिनं अनेक भक्तीपर व्हिडीओज हे शेअर केले होते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगली असते. परंतु आता मात्र तिची पुन्हा एकदा चांगलीच चर्चा रंगली आहे. विरल भयानी या पापाराझी पेजनं तिच्याबद्दलची एक अपडेट दिलेली आहे. नक्की असं काय घडलंय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार, अदाला रूग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तिला फूड एलर्जी झाल्यानं तिला डायरियाचा त्रास झाला. तिला पोटात वेदन होऊ लागल्यानं तिला तातडीनं रूग्णालयात नेण्यात आले होते. त्यामुळे सध्या तिच्या चाहत्यांना काळजी वाटू लागली आहे. याचवर्षी तिचा The Kerala Story हा चित्रपट चांगलाच गाजला होता. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यातही अडकला होता. त्यामुळे या चित्रपटाची जोरात चर्चा सुरू झाली होती. 


हेही वाचा - 'कधीही डिलिव्हरी होणार होती', गरोदरपणात तारेवरची कसरत करत गायिकेनं रेकॉर्ड केलं गाणं


समोर आलेल्या माहितीनुसार, सध्या तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सोबतच डॉक्टर तिच्यावर चांगलीच पाळत ठेवून आहेत. मंगळवारी रात्री तिला त्रास होऊ लागला होता. आज सकाळी 2 ऑगस्टला तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिला विकनेस आलेला आहे. सोशल मीडियावर सगळेच तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत. तिचा 'कमांडो' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे त्यामुळे ती आपल्या या आगामी चित्रपटाच्या रिलिजमध्ये व्यस्त आहे. मंगळवारी ती याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती आणि त्यामुळेच तिची सर्वत्र चर्चा होती. परंतु त्यावेळी तिनं बाहेरचे काहीतरी अरबट सरबट खाल्ले आणि तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला बाहेरचे खाणं अंगवळणी पडले आणि ती आजारी पडली आहे. 



अदा शर्माचे फॅन फॉलोईंगही खूप आहे. त्यातून तिची सोशल मीडियावरही फार चर्चा रंगलेली असते. 1920 या गाजलेल्या चित्रपटातून ती समोर आली होती.