The Kerala Story Box Office Collection :'द केरला स्टोरी' हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी पासून चर्चेत होता. पण हा चित्रपट प्रदर्शित होताच अपेक्षे पेक्षा जास्त कमाई करताना दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. या चित्रपटानं प्रदर्शनाच्या एक ते दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहे. आता या चित्रपटानं प्रदर्शनाच्या 18 दिवसात बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा गल्ला केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द केरला स्टोरी या चित्रपटात अदा शर्मानं मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटाला विकेंडला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. सैकनिल्कनंच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, द केरला स्टोरी या चित्रपटानं प्रदर्शनाच्या 18 व्या दिवशी 5.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यानंतर या चित्रपटानं एकूण 204.47 कोटी रुपयांचा गल्ला केला. त्यानिमित्तानं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत अदा म्हणाली, ‘भारतीय प्रेक्षकांचे मनापासून आभार… गेल्या काही दिवसांत मी चित्रपटाला शुभेच्छा देणारे अनेक पोस्टर्स, होर्डिंग्ज पाहिले आणि सगळ्यात महत्त्वाचे खास चित्रपट पाहण्यासाठी बंगालहून आसामपर्यंत प्रवास करणाऱ्या लोकांचे व्हिडीओ सुद्धा पाहिले. ‘द केरला स्टोरी’ आता प्रेक्षकांचा सिनेमा असल्याने याच्या यशात मला सहभागी करुन घेण्यासाठी धन्यवाद…'



अदा शर्मा पुढे म्हणाली, 'केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्दा ‘द केरला स्टोरी’ला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी हा चित्रपट ब्रिटनमध्ये प्रदर्शित झाला होता तसेच गेल्या काही दिवसांपासून मला अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमधून प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचे मेसेज येत आहेत. यामुळे मी खरंच आनंदी आहे.'


हेही वाचा : RRR चित्रपटाच्या टीमवर शोककळा, अभिनेत्यानं 58 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


पठाणनंतर बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई करणारा हा दुसरा चित्रपट आहे. सैकनिल्कच्या रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानची ऑल टाइम ब्लॉकबस्टर पठाणनं 540 कोटी पेक्षा जास्त कमाई केली. त्यानंतर 2023 या वर्षात सगळ्यात जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला होता. 


'द केरला स्टोरी' या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले तर विपुल शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. केरळमधील महिलांना धर्मांतर करण्यास भाग पाडले आणि त्यानंतर दहशतवादी ग्रुपमध्ये ISIS मध्ये भरती केले. हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित झाला होता. तर या चित्रपटात अदासोबतच सोनिया बालानी, योगिता बिहानी आणि सिद्धी इदनानी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.