The Kerala Story Similar to Caliphate : आपण सगळे सतत कोणत्या चित्रपटाविषयी ऐकत असू तर तो ‘द केरला स्टोरी’ हा आहे.  ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदीप्तो सेननं केलं आहे. या चित्रपटानं प्रदर्शित होण्यापूर्वीच सगळ्यांचे लक्ष वेधले होते. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सतत वादाच्या भोवऱ्यात अडकत होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तर अनेकांनी त्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली. या चित्रपटात 32 हजार नाही तर चार मुलींची कथा दाखवल्याचे समोर आले आहे. कशा प्रकारे त्या चार मुलींपैकी एक त्या तिघींना धर्मांतर करण्यासाठी काय काय बोलते आणि त्यानंतर त्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते. त्यानंतर जे ऐकत नाही त्यांच्यासोबत काय करण्यात येत हे सगळं दाखवण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाचा विरोध होत असला तरी देखील चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. इतकंच काय तर अनेकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी खूप गर्दी केली होती. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या धर्मांतर, ब्रेनवॉश, ISIS मध्ये महिलांची कशी भरती होती याची कल्पना आता अनेकांना आली आहे. पण हे सगळं द केरला स्टोरी या चित्रपटातूनचं प्रेक्षकांना पाहायला मिळाली असं नाही तर त्याआधी देखील एका वेबसीरिजमधून हे सगळं दाखवण्यात आलं होतं. 


हेही वाचा : 'स्त्री जर घटस्फोटीत असेल तर...', Divorce वर 'या' मराठमोळी अभिनेत्री जे काही बोलली त्यात गैर काय?


सगळ्यात आधी हे एका वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आलं होतं. ही वेबसीरिज 2020 साली प्रदर्शित झाली होती. आता तुम्हाला प्रश्न असेल की अशी काही वेबसीरिज आली याविषयी आम्हाला ठावूकचं नाही. तर ही एक स्विडिश वेबसीरिज असून तिचं नाव ‘कॅलीफेट’ असे होते. त्यामुळे अनेकांना या सीरिजविषयी माहित झाले नाही. या वेबसीरिजमध्ये आणि द केरला स्टोरीमध्ये अनेक गोष्टी सारख्या आहेत. यातही दहशतवाद्यांची क्रूरता आणि कॉलेजला जाणाऱ्या मुलींचं कशा प्रकारे ब्रेनवॉश करण्यात येते ते दाखवण्यात आलं आहे. तर ‘कॅलीफेट’ ही सीरिज ‘बेथनल ग्रीन ट्रायो’ या केसवर आधारीत आहे. ही वेब सीरिज आता द केरला स्टोरीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ही सीरिज तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. 



नक्की काय दाखवलंय ‘कॅलीफेट’ सीरिजमध्ये


‘कॅलीफेट’ ही सीरिज तीन मुलींवर आधारीत असलेली कहानी आहे. इतकंच नाही तर ही सीरिज सत्यघटनेवर आधारीत आहे. अमायरा, कदिजा आणि शमीमा या तीन मुलींच्या आयुष्यावर ही कहानी आहे. तर या तीन मुली ब्रिटनच्या राहणाऱ्या होत्या. या मुलींनी 2015 साली इस्लामिक स्टेटमध्ये दाखल झाल्या होत्या. या सीरिजविषयी बोलायचे झाले तर 'इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक डायलॉग’नं दावा केला आहे की पश्चिमात्य देशांतील जवळपास 550 महिला आणि मुली ISIS मध्ये सामील झाल्या होत्या.