मुंबई : जेव्हा स्टारकिड्सचा विषय येतो तेव्हा अभिनेता शाहरूख खान आणि गैरी खानच्या तीन मुलांची चर्चा कायम रंगत असते. त्यांच्या खासगी आयुष्यातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. खान कुटुंबाचे अनेक किस्से असे आहेत जे आजही कोणाला माहिती नाही. त्यामधील एक म्हणजे शाहरूख त्याच्या मुलाला घरात शर्टलेस फिरू देत नाही. याचं कारण देखील शाहरूखने 2017 साली फेमिनासोबत झालेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरूख म्हणतो की, 'मला असं वाटत की घरात कोणत्याचं पुरूषाने शर्टलेस राहू नये. आई, बहिण, नातेवाईक कोणाच्याचं समोर नाही. मी कायम त्याला शर्ट घाल म्हणून सांगत असतो. जेव्हा एखादी आई, बहीण, महिला नातेवाईक किंवा मित्र कपड्यांशिवाय तुमच्या समोर फिरतील तेव्हा तुम्हाला कसं वाटेल?'



पुढे शाहरूख म्हणाला, 'समोरचा तुम्हाला शर्टलेस पाहू शकेल अशी अपेक्षा तुम्ही कशी करू शकता? अशा गोष्टी करू नका ज्या एक मुलगी करू शकत नाही. ' तर शाहरूखचा मुलगा आर्यन खान अभिनेता म्हणून नाही तर एक फिल्ममेकर होण्याचे स्वप्न पाहात आहे. 


शाहरूखबद्दल सांगायचं झालं तर तो गेल्या काही दिवसांपासून रूपरी पडद्यावर दिसला नाही. 2018 साली प्रदर्शित झालेल्या 'झिरो' चित्रपटानंतर त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. महत्त्वाचं म्हणजे शाहरूखचा 'झिरो' चित्रपट  प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अयशस्वी ठरला.  आता शाहरूख 'पठान' चित्रपटाच्यामाध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.