`जोश` चित्रपटातील ऐश्वर्या रायच्या हिरोचा बदलला लूक, फोटो पाहून चाहते थक्क
बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता चंद्रचूर सिंहने 1990 पासून `आवारगी` या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.
मुंबई : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता चंद्रचूर सिंहने 1990 पासून 'आवारगी' या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. यानंतर तो एकामागून एक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसला. 'तेरे मेरे सपने', 'बेताबी', 'दिल क्या करे', 'दाग', 'सिलसाला है प्यार का', 'जोश', 'जुनून' यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये तो दिसला आहे.
चंद्रचूर सिंह याचा जोश हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटात चंद्रचूर सिंगसोबत ऐश्वर्या राय, प्रिया गिल, शाहरुख खान दिसले होते. चित्रपटातील चंद्रचूर सिंग आणि ऐश्वर्या राय यांची केमिस्ट्री चांगलीच पसंतीस उतरली होती.
चंद्रचूर सिंह 53 वर्षांचा झाला आहे. तो टीव्ही सिनेमा तसंच सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. चंद्रचूर सिंहचा लूक पूर्णपणे बदलला आहे. अलीकडेच तो निळ्या रंगाचा कोट आणि निळ्या रंगाच्या पँट परिधान करताना दिसला. चंद्रचूर सिंगचा लूक पाहून चाहतेही थक्क झाले. एका चाहत्याने तुम्हाला ओळखणं कठीण आहे, अशी कमेंट केली, तर दुसऱ्याने तुमचा चेहरा बदलला आहे, अशी कमेंट केली, तर एका युजरने तुमचे व्यक्तिमत्त्व खूप चांगलं आहे, अशी कमेंट केली.
चंद्रचूर सिंह लवकरच अक्षय कुमारच्या पपेट या चित्रपटात दिसणार आहे. अलीकडेच ट्रेलर इव्हेंटमध्ये तो त्याच्या टीम अक्षय कुमार, रकुल प्रीत सिंह, सरगुन मेहतासोबत दिसला. इतकंच नाही तर चंद्रचूर सिंह याआधी सुष्मिता सेनसोबत आर्या या वेब सीरिजमध्येही दिसला होता. या सिरीजमधील सुष्मिता आणि चंद्रचूर सिंग यांची केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच आवडली होती.