अंदाज अपना-अपना`मध्ये काम केल्यानंतर आमीर का म्हणाला सलमानपासून दूर रहायचं आहे?
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमिर आणि सलमानची फारशी चांगली मैत्री नव्हती
मुंबई : १९९० मध्ये 'घायल' या सिनेमानंतर चित्रपट निर्माते राजकुमार संतोषी पुढच्या चित्रपटावर काम करत होते. 'दामिनी' असं या सिनेमाचं नाव होतं. त्याचवेळी विनय कुमार सिन्हा नावाचा एक माणूस त्यांच्या सनी सुपर साउंडवाल्या ऑफिसमध्ये पोहोचला. विनय आपल्या करिअरच्या सुरूवातीला सिनेमांचं प्रोडक्शन इंचार्ज म्हणून काम करत होता. नंतर त्यांनी 'शोले' फेम अमजद खानचं काम पाहण्यास सुरवात केली.
आता त्याला चित्रपट निर्मितीत पाऊल टाकायचं होतं. याच संदर्भात तो बोलण्याच्या उद्देशाने राजकुमार संतोषी यांच्या ऑफिसमध्ये गेला. संतोषी जेवू लागले तेव्हा विनय म्हणाला की, संतोषी तुम्ही माझ्या निर्मितीचा चित्रपट दिग्दर्शित कराल का? असा प्रश्न विचारला. यावर म्हणाले, बिल्कुल करणार
चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या म्हणण्यानुसार 'अंदाज अपना अपना' या मारहाणी मागील मुख्य कारण या चित्रपटाच्या मुंबई टेरिटरीचा डिस्ट्रिब्यूटर होता. संतोषीने त्यांच्या एका मुलाखतीत ते म्हटले आहे की, जेव्हा 'अंदाज अपना अपना' बनवला जात होता, तेव्हा हा डिस्ट्रिब्यूटर त्यांच्याकडे चित्रपट विचारण्यासाठी आला होता.
तो पूर्णपणे नवीन डिस्ट्रिब्यूटर होता. त्याला चित्रपटाबद्दल फारशी माहिती नव्हती. पण संतोषीने त्याला त्याचा चित्रपट दिग्दर्शित करणार असं वचन दिलं होतं. आणि म्हणूनच, तो त्याच्या दिलेल्या वचनामुळे मागे फिरु शकला नाही. संतोषीचा, जेव्हा 'अंदाज अपना अपना' रिलीज झाला तेव्हा सलमान, आमिर आणि संतोषी स्वत: मुंबईबाहेर इतर सिनेमांचे शूटिंग करत होते. सिनेमाच्या अवस्थेबद्दल जेव्हा त्याला समजलं तोपर्यंत हा विषय हाताबाहेर गेला होता.
सलमान आणि आमिर सेटवर एकमेकांशी बोलत न्हवते?
1991 मध्ये राजकुमार संतोषीच्या प्लॅननुसार 'अंदाज अपना अपना' चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं. या सिनेमाला धर्मेंद्र आणि सचिन तेंडुलकर यांनी पाठिंबा दर्शविला होता. वृत्तपत्रांच्या गॉसिपपासून ते चित्रपट, मासिकांपर्यंत, सलमान आणि आमिर यांच्यात 'अंदाज अपना अपना'च्या सेटवर इगोच्या चकमकीच्या बातम्या आल्या.
चित्रपटाशी संबंधित बर्याच बातम्यांमध्ये असंही लिहिले गेलं होते की, सलमान आणि आमिर सेटवर एकमेकांशी बोलत नव्हते. मात्र, राजकुमार संतोषी यांनी या फेक न्यूज असल्याचं म्हटलं. कारण हा एक विनोदी चित्रपट होता. संपूर्ण खेळ कलाकारांच्या कॉमिक टाइमिंग आणि म्युच्युअल केमिस्ट्रीवर होता. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमिर आणि सलमानची फारशी चांगली मैत्री नव्हती. पण दोन्ही कलाकार एकमेकांसोबत काम करण्यास कर्म्फटेबल होते.