आईची साडी नेसून मराठमोळी अभिनेत्री अवतरली `कान्स`च्या रेड कार्पेटवर
यंदा फ्रान्समध्ये ७७ वा कान्स चित्रपट महोत्सव साजरा होत आहे. या इव्हेंटमध्ये अनेक सेलेब्स रोज रेड कार्पेटवर दिसतात. ऐश्वर्यापासून आलियापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कान्समध्ये हजेरी लावली आहे.
मुंबई : छाया कदम हिंदी चित्रपटांसोबतच अनेक मराठी चित्रपटांमध्येही दिसली आहे. 56 व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही या अभिनेत्रीला मिळाला. संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडीमध्येही ही अभिनेत्री दिसली आहे. आजकाल छाया मंजू माईच्या रुपात लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसत आहे. आता छाया कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली आहे. यंदा फ्रान्समध्ये ७७ वा कान्स चित्रपट महोत्सव साजरा होत आहे. या इव्हेंटमध्ये अनेक सेलेब्स रोज रेड कार्पेटवर दिसतात. ऐश्वर्यापासून आलियापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कान्समध्ये हजेरी लावली आहे.
छाया कदम यांनी एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यामध्ये छाया यांनी कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ''आई तुला विमानातून फिरवण्याचे माझे स्वप्न अधुरे राहिले....पण आज तुझी साडी आणि नथ मी विमानातून कान्स फिल्म फेस्टीव्हल पर्यंत घेऊन आले, याचे समाधान आहे.तरी आई ! आज तू हवी होतीस. हे सगळं पाहण्यासाठी.Love you मम्मुडी आणि खूप खूप मिस यू.'' अनेकांनी या पोस्टवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत आहे.
अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने या पोस्टवर कमेंट करत लिहीलं आहे की, खूप प्रेम छाया ताई. तर एका चाहतीने कमेंट करत लिहलं आहे की, छाया ताई खूप खूप प्रेम तुम्हाला. तर अजून एकाने लिहीलंय, ताई तुम्ही खूप सुंदर ड्रेंसिंग निवडलं. खूप सुंदर दिसताय ताई. आम्हा प्रत्येकाला तुमचा खूप अभिमान आहे. तर अजून एकाने लिहीलंय, आम्हाला खूप अभिमान आहे तुझा ताई. तर अजून एकाने म्हटलंय, खरा कलाकार हळवा असतो. तर अजून एकाने म्हटलंय, खुप कौतुक खुप खुप प्रेम. तर अनेकांनी छाया कदम यांच्या फोटोवर कमेंट करत शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे.
शेअर केलेल्या फोटो छाया कदम सोनेरी रंगाच्या साडीत दिसत आहे. या साडीवर कॉन्ट्रास जांभळ्या रंगाचा लॉन्ग स्लिव्ह्सचा ब्लाऊज छाया यांनी घातला आहे. केसांचा आंबाडा त्यावर मोगऱ्याचा गजरा कपाळी टीकली, मोठे कानातले आणि नाकात नथ असा मराठमोळा लूक करुन आपली मराठमोळी अभिनेत्री छाया कदम कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरली. त्यामुळे अभिनेत्रीच्या या लूकवर तिचे चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत.