मुंबई : मोहसीन खान दिग्दर्शित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे एक नवीन गंमतीशीर पोस्टर आपल्या भेटीला आले आहे. पोस्टरमध्ये प्रथमेश परबच्या हातातील गिफ्टबॉक्समध्ये एक गोंडस बाळ दिसत आहे. त्याच्या बाजूला पृथ्विक प्रताप आणि डॅाक्टरच्या वेषात अंकिता लांडे पाटीलही दिसत आहे. त्यामुळे आता प्रथमेश या बाळांची डिलिव्हरी करणार का, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना ९ फेब्रुवारीला मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन निर्मित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत तर फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले आहे.


दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात,  " या चित्रपटातून एक वेगळा विषय मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सरोगसीसारख्या नाजूक विषयावर भाष्य करणाऱ्या आमच्या या चित्रपटातून प्रेक्षकांना संदेश देण्याचा एक प्रयत्न आहे. मात्र हे करताना या विषयाचे गांभीर्य  जपत आम्ही त्याला विनोदाची साथ दिली आहे.’’
 
काही दिवसापुर्वी या सिनेमातील भाऊचा नादखुळा हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. एल. के. लक्ष्मीकांत यांनी त्यांच्या जबरदस्त आवाजात हे गाणे गायले असून या गाण्याला संगीत देखील त्यांचेच आहे. तर राम खाटमोडे यांनी शब्दबद्ध केलेल्या या धमाल गाण्याचे नृत्य दिग्दर्शन जित सिंग यांनी केले आहे. हा चित्रपट ९ फेब्रुवारीला आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करायला येणार आहे. 


सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स निर्मित 'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत तर फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. मोहसीन खान दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले असून यात प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप आणि अंकिता लांडे पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


काही दिवसांपूर्वीच ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टरही आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. सोशल मीडियावर झळकलेल्या पोस्टर आणि टीझरला काही दिवसातच लाखो प्रेक्षकांची पसंती मिळत असतानाच आता या चित्रपटातील नवं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.