मुंबई : जस्मिन भसीन बिग बॉसपासून सतत चर्चेत आहे. आज जस्मिन तिचा वाढदिवस साजरा करत आहे. जस्मिनचा जन्म 28 जून 1990 रोजी झाला. 'दिल से दिल तक' या मालिकेतून अभिनेत्रीला ओळख मिळाली. या शोमध्ये तिचा सहकलाकार सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई होते. यानंतर जस्मिन बिग बॉस 14 मध्ये दिसली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉसमध्ये जास्मिन भसीन आणि अली गोनी यांच्या अफेअरचा खुलासा झाला. यासोबतच अभिनेत्रीने नॅशनल टीव्हीवर तिच्या आयुष्यातील गडद टप्प्याबद्दलही खुलासा केला. जास्मिन भसीनने बिग बॉसच्या घरात सांगितलं की, एकवेळ अशी होती जेव्हा तिला आत्महत्या करायची होती.


जस्मिनने इंडस्ट्रीतील सुरुवातीच्या काळातील संघर्षाबद्दल सांगितलं. कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक ठिकाणाहून नकार मिळाल्यानंतर ती आत्महत्या करण्याचा विचार करू लागली. यावेळी ती डिप्रेशनची शिकार झाली होती. आपल्यात अनेक त्रुटी आहेत, असं आपल्याला वाटत असल्याचं तिने सांगितलं. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर जास्मिन भसीननेही एका मुलाखतीत याबद्दल मोकळेपणाने सांगितलं.


मुलाखतीत जास्मिनने सांगितलं की, ''मी खूप पूर्वीपासून माझ्या आयुष्याच्या गडद टप्प्यात होते. जेव्हा मी मुंबईत आले आणि स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी धडपडत होते. ती लढाई माझी माझ्याशीच होती, कारण कुठेतरी मी माझा आत्मविश्वास गमावत होते. मला वाटलं की माझ्यात दोष आहेत. माझ्या त्वचेत दोष आहेत. मी छान दिसत नाही त्यामुळे मला रोज नकारांना सामोरं जावं लागलं होतं."