मुंबई : राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृह २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सिनेप्रेमी आणि नाटक प्रेमींसाठी अत्यंत महत्वाची बातमी.  राज्य सरकारने जारी केलेल्या जीआरनुसार २२ ऑक्टोबरपासून  राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृहे खुली होणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पन्नास टक्के उपस्थितीत राज्यातील नाट्यगृह आणि सिनेमागृह सुरू होणार आहे.  एक सीट रिकामी ठेवून बसण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  नाट्यगृह आणि सिनेमागृह सुरू करण्यापूर्वी सॅनिटायझेशन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.  मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. 


प्रशांत दामले यांची प्रतिक्रिया 


खूप काळाच्या प्रतिक्षेनंतर आता मराठी रंगभूमीवरील पडदा वर जाणार आहे, परत रंगमंच प्रकाशाने उजळून जाणार आहे आणि रसिकांचे रंजन करायला सज्ज होणार आहेत - तुमचे लाडके नाट्यकर्मी!
’एका लग्नाची पुढची गोष्ट’ आणि ’तू म्हणशील तसं’ ह्या दोन सदाबहार नाटकांचे कलाकार उद्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करत रंगभूमीवरील एका नव्या पर्वाचा श्रीगणेशा करणार आहेत!
ह्या नाटकांना, रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभत राहो हीच त्या गणेशाच्या चरणी प्रार्थना!