मुंबई : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील दिवंगत अभिनेत्री नूतन यांच्या घरी चोरी झाली आहे. चोरांनी त्यांच्या घरातून नळ आणि पाईप लंपास केले आहेत. शनिवारी याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पोलिसांनी आरेपीची ओळख कळवा येथील भास्कर नगर मधील रहिवासी संजय भंडारी म्हणून केली आहे. चौकशी दरम्यान याप्रकरणी आणखी दोन आरोपी सामिल असल्याचं सांगितलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीतू वाघमारे आणि गणपत गुलार अशी त्यांची नावे आहेत. पोलीस सध्या या दोघांचा शोध घेत आहेत. अभिनेत्रीच्या घरी ही चोरी ३ फेब्रुवारी रोजी झाली होती. या तीन चोरांनी बंगल्यात तैनात असलेल्या दोन रक्षकांना नियंत्रित करून घरात प्रवेश केला.


अभिनेत्री नूतन बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यांनी १९५० साली 'हमारी बेटी' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या करियरला सुरूवात केली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दित ७० चित्रपटांमध्ये काम केले आहे. 


'सीमा', 'सुजाता', 'छलिया', 'बंदिनी', 'मिलन', 'सौदागर', 'मैं तुलसी तेरे आंगन की', 'अनुराग', 'मेरी जंग' अशा एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये भूमिका साकरल्या आहेत. अखेर १९९१ साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला.