ब्रेस्टफिडिंगचे फोटो आहेत, मग त्यात गैर काय? अभिनेत्रींकडून ट्रोलर्सची बोलती बंद...
फक्त सामान्य महिलांना नाही तर लोकांच्या या मानसिकतेचा सामना बॉलिवूड अभिनेत्रींनाही करावा लगला आहे.
मुंबई : एखादी आई सार्वजनिक स्थळी तिच्या बाळाला दूध पाजत असेल तर, अनेक पुरूष तिच्याकडे वाईट नजरेने पाहातात. सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करणं पुरूषांना अश्लिल वाटत. पण तेव्हा इतरांचे सर्व विचार बाजूला करत ती आई बाळाची भूक भागवण्याचा प्रयत्न करत असते. लोकांच्या या मानसिकतेचा सामना बॉलिवूड अभिनेत्रींनाही करावा लगला आहे. हिच मानसिकता बदलण्यासाठी अभिनेत्रींना स्तनपान करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
अभिनेत्री नेहा धुपिया
सोशल मीडियावर नेहाची मुलगी मेहरचे फोटो तुफान व्हायरल होत असतात. मेहरला प्रत्येत जण क्यूट आणि निरागस मानतात. पण जेव्हा नेहाने ब्रेस्टफीडिंग करताना सोशल मीडियावर फोटो शेअर केला तेव्हा तिला तुफाम ट्रोल करण्यात आलं.
अभिनेत्री लीजा डे
अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री आणि मॉडेल लिजा डे कायम तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. पण जेव्हा लिजाने ब्रेस्टफीडिंग करताना सोशल मीडियावर फोटो शेअर केला तेव्हा तिला तुफाम ट्रोल करण्यात आलं.
अभिनेत्री एमी जॅक्सन
अभिनेत्री एमी जॅक्सनने देखील सोशल मीडिया सोशल मीडियावर ब्रेस्टफीडिंग करताना फोटो शेअर केला तेव्हा तिला तुफाम ट्रोल करण्यात आलं.
सेलिना जेटली
अभिनेत्री सेलिना जेटली आज झगमगत्या जगापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती कायम चर्चेत असते. 2012 साली तिने जुडवामुलांना जन्म दिला. ब्रेस्टफीडिंग करताना फोटो शेअर केला तेव्हा तिला अश्लिल म्हणण्यात आलं.
अभिनेत्री अमृता राव
अभिनेत्री अमृता रावने आरजे अनमोलसोबत लग्न केलं आहे. दोघांना एक मुलगा देखील आहे. अनमोलने अमृताचा एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये अमृता बाळाला ब्रेस्टफीड करताना दिसली.