मुंबई : बॉलिवूड कलाकार हे नेहमीच जाहिरातीची पहिली पसंत असतात. छोट्या छोट्या जाहिरातीकरता सध्या कलाकार मोठी रक्कम आकारतात. टीव्ही, वर्तमानपत्र, डिजिटल या तिन्ही माध्यमातून आपण जाहिराती पाहतो. पण तुम्हाला माहित आहे का? या जाहिरातीकरता आपले कलाकार किती रुपये आकारतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाहिरातींच्या या जगात अभिनेत्यांची जास्त चर्चा आहे. यामध्ये आमीर खान, अमिताभ बच्चन, सलमान खान, राजकुमार राव, आयुष्मान खुराना सारखे अनेक कलाकार आपल्याला जाहिरातींमध्ये दिसतात. 



दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, जाहिरातीतून सर्वाधिक मानधन मिळणाऱ्या यादीत अभिनेता आमीर खानचा सर्वात पहिला नंबर आहे. जवळपास 11 करोड रुपये आमीर खान एका जाहिरातीकरता आकारतो. अनेक मोबाइल, थंड पेय यासारख्या कंपन्यांकरता आमीर खान जाहिराती करतो. 


दुसऱ्या क्रमांकावर किंग खान शाहरूख खान आहे. शाहरूख खान 9 करोड रुपये आकारतो एका जाहिराती करता. सध्या शाहरूख खानची BYJU's ची जाहिरात टीव्हीवर पाहायला मिळत आहे. 



आमीर, शाहरूखनंतर बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन देखील 9 करोड रुपये आकारतात. तर अक्षय कुमार जाहिरातीकरता 7 करोड रुपये आणि सलमान खान 7 करोड रुपये एका जाहिरातीकरता आकारतात. जुन्या कलाकारांना आता नवीन कलाकारांची टक्कर मिळत आहे. 



नवीन कलाकार देखील आता मागे राहिलेले नाहीत. त्यांनी देखील बॉलिवूडबरोबरच जाहिरात क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 
नवीन कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर 'मसान' सिनेमापासून तरूणींच्या मनातील ताईत बनलेला अभिनेता विक्की कौशल देखील या यादीत आहे. विक्की कौशल जाहिरातीकरता 3 करोड रुपये आकारतो. 




त्यानंतर अभिनेता टायगर श्रॉफ 2.5 करोड रुपये आकारतो. आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना भुरळ घालणारा अभिनेता आयुष्मान खुराना देखील या यादीत असून तो 2.25 करोड रुपये आकारतो. तर आपल्या अभिनयाची छाप पाडणारा राजकुमार राव 1.5 करोड रुपये आकारतो.