Indian movies : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसह भारतात अनेक कलाकार आहेत. ज्यांचे चाहते भारतासह इतर देशांमध्ये देखील आहेत. ते देखील आपल्या आवडत्या अभिनेत्याचे चित्रपट बघत असतात. त्यापैकीच एक म्हणजे सौदी अरेबिया हा देश आहे. जिथे लोक अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, रणबीर कपूर आणि इतर अनेक भारतीय कलाकारांचे चित्रपट बघत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आम्ही देखील तुम्हाला अशाच 10 भारतीय चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. जे सौदी अरेबियामध्ये सर्वाधिक पाहिले गेले आहेत. विशेष म्हणजे या 10 चित्रपटांच्या यादीतील सर्वात खास म्हणजे त्यातील 3 नावे तर शाहरुख खानच्या चित्रपटांची आहेत. 


शाहरुख खानच्या 3 चित्रपटांचा समावेश 


बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शाहरुख खानचा 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जवान' या चित्रपटाचे सौदी अरेबियामध्ये देखील खूप चाहते आहेत. सौदी अरेबियामध्ये या चित्रपटाचे 2 लाख 92 हजार ऐवढे प्रेक्षक आहेत. याचाच अर्थ जवळपास 3 लाख लोकांनी शाहरुख खानचा हा चित्रपट पाहिला आहे. 


त्यानंतर शाहरुख खानचा पुढचा चित्रपट आहे 'पठाण'. हा चित्रपट देखील 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभरात 1050 कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटाचे 1 लाख 71 हजार तिकिटे सौदी अरेबियामध्ये विकली गेली होती. त्यानंतर शाहरुखचा 2023 मधील 'डंकी' हा चित्रपट सौदी अरेबियामध्ये सर्वाधिक पाहिलेल्या भारतीय चित्रपटांच्या यादीतील 3 चित्रपट आहे. 


सौदी अरेबिया सर्वाधिक पाहिलेले 7 चित्रपट 


  1. टाइगर 3 - हा चित्रपट 64 हजार लोकांनी पाहिला आहे. 

  2. लियो - हा चित्रपट देखील 61.5 हजार लोकांनी पाहिला आहे. 

  3. जेलर- हा चित्रपट 49 हजार लोकांनी पाहिला आहे. 

  4. KGF 2 - 48 हजार लोकांनी बघितला आहे. 

  5. एनिमल- 46 हजार लोकांना हा चित्रपट पाहिला आहे. 

  6. मंजुमेल बॉयज - हा चित्रपट देखील 40 हजार लोकांनी पाहिला आहे.

  7. Goat - 34.8 हजार लोकांना हा चित्रपट पाहिला आहे. 


वरील सर्व चित्रपट हे भारतात देखील प्रेक्षकांनी खूप वेळा पाहिले आहेत. या चित्रपटांनी सौदी अरेबियामध्ये देखील आपला ठसा उमटवला आहे. या चित्रपटांच्या यादीत शाहरुख खानने टॉप 1 ते 3 मध्ये स्थान पटकावले आहे.