Bollywood Celebrity : बॉलीवूड कलाकारांकडे मोठी लक्झरीयस लाईफ असते हे आपल्याला माहितीच आहे. आपल्याला त्यांचे लक्झरीयस लाईफ पाहून असे वाटते की आपणही त्यांच्याप्रमाणे मोठ्या बंगल्यांमध्ये रहावे, त्यांच्यासारख्या महागड्या गाड्या आपल्याकडे असाव्यात. परंतु तुम्हाला माहितीये का की बॉलीवूडमध्ये असेही कलाकार आहेत जे उधळपट्टी करण्यापेक्षा पैशांची बचत करतात. (these bollywood celebrity spend less on saves money instead of being millionaire)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांच्याकडे पुष्कळ मोठी संपत्ती असूनही त्यांना कुठलाच जास्तीचा खर्च करायला आवडत नाही. ते तुमच्या आमच्यासारखंच सर्वसामान्य आयुष्य जगतात. 


या सेलिब्रेटींना महागडे फोन, महागड्या गाड्यांमध्ये फिरणं आवडत नाही तर तसेच महागडे आणि लक्झरीयस कपडे घालणे आवडत नाही. या यादीत मोठ्या बॉलीवूड स्टार्सचा समावेश आहे. 


सारा अली खान (Sara Ali Khan) 


सारा अली खान आजच्या काळातल्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. आजच्या काळात तरुणांना चैनीच्या वस्तू आवडतात पण सारा मात्र त्यांच्यापेक्षा खूप वेगळी आहे. सारा रोज साधेच कपडे घालून फिरते. इतकेच नाही तर अनेक वेळा ती रिपीट कपडेही घालते. इतकेच नाही तर जान्हवीने काही दिवसांपूर्वी 'कॉफी विथ करण' या शोमध्ये साराला चीप असं म्हटले होते. तिनं सांगितले की जेव्हा त्या दोघी केदारनाथला गेल्या होत्या तेव्हा साराने एक स्वस्त हॉटेल बुक केले होते.


काजोल (Kajol)


काजोल टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सुपरस्टार अजय देवगणची पत्नी आहे. काजोल जास्त खर्च करायला आवडता नाही. तिला महागड्या वस्तू घेणे आवडत नसल्याची कबुली तिने स्वतः दिली आहे. ती ऑनलाइन स्वस्त वस्तू खरेदी करत असते. 


सलमान खान (Salman Khan)


सलमान खान बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. त्याला कशाचीही कमतरता नाही. पण त्याला जास्त खर्च करायला आवडत नाही. तो नेहमी साध्या टी-शर्ट आणि जीन्सवर असतो. सलमानचा मेहुणा आयुष शर्माने एका मुलाखतीत सांगितले होते की, सलमानकडे कोणताही लेटेस्ट फोन नसून जुने मॉडेल आहे. त्यांच्या घरात नवीन मॉडेलचा टीव्ही नाही.